

कराटे चॅम्पियनशिपमध्ये डोंबिवलीकर चमकले
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ : इंडो-भुतान आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप २०२५ अंतर्गत आयोजित दुसरी साऊथ एशियन स्पोर्ट चॅम्पियनशिप १७, १८ आणि १९ जून रोजी भुतान शोटोकान कराटे असोसिएशन यांच्या वतीने पार पडली. या स्पर्धेत डोंबिवलीच्या १२ वर्षीय सई दिनकर सोमासे हिने तीन रौप्यपदकांची कमाई केली. सई सोमासे हिने मर्दानी खेळ, काता स्पर्धा आणि कराटे फाईट अशा तिन्ही प्रकारांत सहभाग घेतला होता. या तिन्ही प्रकारांत रौप्यपदक पटकावले. सई ही महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता सातवीत शिकत असून, तिने अतिशय खडतर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत आपली चमक दाखवली. या स्पर्धेत सईसह डोंबिवलीतील अनेक खेळाडूंनी भाग घेतला होता. अमन शहू, गणेश मांजरेकर, प्रत्युष टनकर, अनुज देसले, वंश अध्यापक, आयुष घुमरे, रुद्र घाडीगावकर, अरीत्रा कांची, स्वरांगी परदेशी, जीया कदम, आर्या कारंबलेकर आणि पूजा धाबाडे या सर्व खेळाडूंनीही विविध प्रकारांत पदक मिळवत डोंबिवलीचे नाव भुतानमध्ये उज्ज्वल केले. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक सुनील वडके यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी महिनाभर खेळाडूंना अत्यंत शिस्तबद्ध आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण दिले. सुनील वडके यांनी याआधीही अनेक खेळाडूंना घडवले असून, कराटे क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.