भाजपच्या मंडळ अध्यक्षपदी सुभाष हरड

भाजपच्या मंडळ अध्यक्षपदी सुभाष हरड
Published on

किन्हवली (बातमीदार)ः संघटनवाढीच्या दृष्टीने महाराष्ट्रात भाजपने बांधणी सुरू केली आहे. त्यानुसार संघटन पर्व अभियानातून भारतीय जनता पार्टीच्या ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील शहापूर ग्रामीण पूर्व मंडळाच्या अध्यक्षपदी सुभाष हरड यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे पूर्वाश्रमीचे शहापूर तालुकाध्यक्ष असलेले सुभाष हरड २०१२ साली शहापूर पंचायत समितीचे उपसभापती, २०१६ ते २२ पर्यंत पंचायत समितीचे भाजपचे गटनेते म्हणून निवडून आले आहेत. तसेच ठाणे जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे संघटन बांधणी, प्रशासनाचा दांडगा अनुभव तसेच लोकांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीची अध्यक्षपदी निवड झाल्याने संघटन बांधणीला चालना मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com