

वज्रेश्वरी, ता. ११ (बातमीदार): गावातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास शासनाने निर्मल भारत आणि स्वच्छता अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून शासनाने ‘स्वच्छ भारत मिशन’ ही मोहीम सुरू केली आहे, मात्र भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायतींच्या स्वच्छता मोहिमेची गती मंदावली आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान निर्मलग्राम, हगणदारीमुक्त गाव पाठोपाठ शासनाने ग्रामीण भागात ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून सर्व गावे कचरामुक्त करण्याचा संकल्प पूर्णत्वास असल्याचे बोलले जात आहे. ग्रामीण भागातील हगणदारीमुक्त करण्यासाठी घरात शौचालये बांधण्यावर जोर दिला गेला आहे. ही योजना पारदर्शक पद्धतीने राबविल्याने गाव परिसर स्वच्छ ठेवून आरोग्य निरोगी ठेवता येऊ शकते, पण तालुक्यातील ग्रामीण भागांचे वास्तव वेगळेच आहे. या अभियानाच्या मूळ उद्देशालाच ग्रामीण भागात हरताळ फासण्यात आला आहे. शौचालये, घंटागाडीतून कचऱ्याचे व्यवस्थापन अनिवार्य असताना रस्त्यालगत जागोजागी कचरा फेकला जात आहे. त्यामुळे अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचले असून, आरोग्य धोक्यात आहे.
----------------------------
तक्रारींकडे कानाडोळा
ग्रामीण भागात घरातील घनकचरा टाकण्यासाठी ग्रामपंचायतींनी ठोस उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांना नाइलाजाने गावातील रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणांवर कचरा टाकावा लागतो. तसेच गटारींची सोय नसल्याने कचऱ्यात मुरणाऱ्या सांडपाण्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरून दुर्गंधी पसरते. यामुळे रोगराई पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.