संतोष पवार यांची अध्यक्षपदी निवड

संतोष पवार यांची अध्यक्षपदी निवड
Published on

मुरबाड (बातमीदार)ः तालुका शेतकरी सहकारी संघाच्या संचालक मंडळाचा २०२१ मध्ये कालावधी संपला आहे. तेव्हापासून प्रशासकाची संस्थेवर नेमणूक करण्यात आली होती. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मुरबाड यांनी १० जून रोजी आदेश काढून नवीन प्रशासक मंडळ नेमले आहे. प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी संतोष पवार यांची नेमणूक करण्यात आली आहे, तर सदस्यपदी योगेश भोईर, मिलिंद मडके, संतोष भांगरथ, अनंत शिंगोळे, श्रीमती हर्षला भोईर, रमाकांत सासे, चंद्रकांत बोस्टे, संतोष दळवी, नामदेव कंटे यांची नेमणूक करण्यात आली आहे. या निवडीमुळे मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाच्या संचालक मंडळावर भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यात आमदार कथोरे यांना यश आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com