रस्ता रुंदीकरणानंतर पुन्हा अतिक्रमण

रस्ता रुंदीकरणानंतर पुन्हा अतिक्रमण
Published on

भिवंडी, ता. ११ (वार्ताहर)ः काँक्रीटीकरणासाठी रुंदीकरणानंतर पुन्हा त्याच रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आले आहे. याप्रकरणी पालिका प्रशासन कारवाई करत नसल्याची तक्रार रस्ते रुंदीकरणात बाधित व्यावसायिकाने केली आहे.
शहरातील बांगड गल्ली झेंडा नाका परिसरात रस्ता काँक्रीटीकरणासाठी रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे. या कारवाईत किशोर जव्हेरी, श्रीमती सुनीता जव्हेरी व राहुल किशोर जव्हेरी यांचे घर क्रमांक १ येथील वाणिज्य मिळकत बाधित झाले आहे. अवघी सव्वा फूट जागा शिल्लक असताना शेजारील काही मालमत्ताधारकांनी त्यांच्या बाधित बांधकामाचा वापर करून अधिक जागेत अतिक्रमण केले आहे, तर रस्ता रुंदीकरणावेळी पालिकेने काही ठिकाणी मोजमाप घेताना अन्याय केला आहे. तसेच महापालिकेकडे ११ फेब्रुवारी रोजी तक्रार करण्यात आली आहे, पण पालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याने किशोर जव्हेरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
------------------------------------------
महिनाभरापूर्वी तक्रार
पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर केलेले बांधकाम स्वखर्चातून काढून टाकण्याचे आदेश दिले असल्याची माहिती स्थानिक प्रभाग समिती क्रमांक पाचचे प्रभारी सहाय्यक आयुक्त बाळाराम जाधव यांनी दिली आहे, पण एक महिन्याच्या कालावधीनंतरही पालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याने किशोर जव्हेरी यांनी पालिकेविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com