एकाच आठवड्यात दोन घरफोडी

एकाच आठवड्यात दोन घरफोडी
Published on

अंबरनाथ, ता. ११ (वार्ताहर) : अंबरनाथमध्ये एकाच आठवड्यात दोन चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. चोरांनी घरफोडी करून लाखोंचे दागिने चोरून फरार झाले आहेत. वाढत्या चोरीच्या घटना पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.

अंबरनाथ पश्चिम येथील बुवापाडा परिसरातील नालंदा चाळीत अरुणा जगधाने या ५२वर्षीय गृहिणी राहतात. त्यांच्या घरातील कपाटाचे लॉकर तोडून त्यातून सुमारे तीन लाखांचे दागिने चोरांनी मंगळवारी (ता. १०) सकाळी दहाच्या सुमारास चोरून फरार झाले. यामध्ये सुमारे अडीच तोळ्याचे ४२ हजारांचे सोन्याचे पेंडल, साडेपाच हजारांची सोनसाखळी, एक लाख ३६ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र, ७३ हजारांचे मनी, वाटी, कानातले, सात हजारांची सोन्याची अंगठी, तसेच २१ हजारांचे मंगळसूत्र आदी मुद्देमाल होता. या संदर्भात अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल धुमाळ करत आहेत. दरम्यान, याच आठवड्यात ६ जूनला कमलाकर नगरमधील अंबर रेसिडेन्सीमध्ये व्यावसायिक मोहमद आयुब आशरफ खान यांच्या घरातील कपाटाचे लॉकर तोडून सव्वा लाखांचे दागिने चोरांनी लंपास केले. यामध्ये दोन जोडी सोन्याचे कानातले, दोन सोनसाखळी, दोन अंगठी, मंगळसूत्र असे सुमारे सव्वा लाखांचे दागिने चोरून चोरटे पसार झाले. या संदर्भात अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com