

तुळशी वृंदावनमध्ये वडाचे रोप लावून वटपौर्णिमा साजरी
कांदिवली, ता. ११ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिमेला म्हाडा वसाहतीतील परिवर्तन सहकारी गृहनिर्माण संस्थेत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली. महिलांनी तुळशी वृंदावनात वडाचे रोप लावून मनोभावे पूजा केली. वडाचे रोप थोडे वाढले की, मोकळ्या जागेत लावणार असे सुषमा नानरकर यांनी सांगितले. कांदिवली महावीर नगर, एकता नगर म्हाडा वसाहतीमधील परिवर्तन संस्थेच्या महिलांनी वटपौर्णिमेनिमित्त हा उपक्रम राबवला. रेश्मा धुरी, अशा मोहिते, विद्या कांबळी, सुनिता चासकर, मीनाक्षी मालकर, सुषमा नानरकर, मालती पाटील, सुधा रावराणे आदी महिलांनी यात सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.