अलिबाग शहराच्या प्रवेशद्वारावरील खड्डे भरण्यास सुरुवात

अलिबाग शहराच्या प्रवेशद्वारावरील खड्डे भरण्यास सुरुवात
Published on

अलिबाग शहराच्या प्रवेशद्वारावरील खड्डे भरण्यास सुरुवात
माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांचा पुढकार
अलिबाग, ता. ११ (वार्ताहर) ः अलिबाग शहराच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून खड्ड्यांचे साम्राज्य आहे. अखेर नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम बुधवार (ता. ११)पासून सुरू केले आहे. या रस्त्याच्या कामामुळे बायपास मार्गावरील वाहतूक वळवून अलिबाग-मांडवा मार्गाकडून करण्यात आली आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्याने वाहनचालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
अलिबाग शहराचे प्रवेशद्वार असलेल्या चेंढरे बायपास, निलिमा हॉटेल, रेवदंडा बायपास रोड या परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून हीच परिस्थिती आहे. येणाऱ्या -जाणाऱ्या प्रवाशांसह नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. याबाबत तक्रार केल्यानंतर तात्पुरती डागडुजी केली जाते. खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा वापर करण्यात येतो. त्यामुळे काही महिन्यातच ही पेव्हर ब्लॉक उखडलेले असतात. यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे. रस्त्यावरून ये-जा करताना विद्यार्थी व पालकांना कसरत करावी लागत आहे. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचेदेखील खड्ड्यांमुळे हाल होत आहेत. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे अनेकवेळा वादही होत आहेत. अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. त्यामुळे पर्यटकांसह नागरिकांची हजारोंच्या संख्येने या ठिकाणी वर्दळ असते. अलिबाग शहराच्या प्रवेशद्वारासमोरच असलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांसह प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करून नागरिकांचा प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा हा रस्ता स्वखर्चाने करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी प्रशांत नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. त्यानंतरही कोणताही सकारात्क प्रतिसाद न मिळाल्याने अखेर माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम बुधवारपासून सुरू केले आहे. या रस्त्याच्या कामामुळे बायपास मार्गावरील वाहतूक वळवून अलिबाग-मांडवा मार्गाकडून करण्यात आली आहे. रस्त्याचे काम होईपर्यंत वाहनचालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com