फसवणूक करणाऱ्या विकसकांवर कारवाई

फसवणूक करणाऱ्या विकसकांवर कारवाई
Published on

फसवणूक करणाऱ्या विकसकांवर कारवाई
पुनर्विकास प्रकल्पाबाबत बैठक

कल्याण, ता. ११ ( वार्ताहर) : शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या १४ वर्षांपासून रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पाची गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी गंभीर दखल घेतली आहे. माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने मंत्र्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यामध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी सर्वतोपरी मदत राज्य सरकारकडून देण्याचे आश्वस्त केले. तसेच या प्रकल्पात रहिवाशांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवरही कायदेशीर कारवाईचे निर्देश डॉ. भोयर यांनी दिले आहेत.

कल्याण पश्चिमेतील मौजे चिकणघर येथील म्हाडाच्या शांतीदूत गृहनिर्माण हौसिंग सोसायटी व रवीउदय को ऑप. सोसायटीतर्फे २०११ मध्ये पुनर्विकास प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र विकसकांनी १४ वर्षांहून अधिक काळ उलटूनही त्यांच्याकडून हा प्रकल्प पूर्ण केला नाही, तसेच लेखी करारानुसार झालेल्या गोष्टींचीही पूर्तता केली नाही. त्यामुळे या शेकडो रहिवाशांवर देशोधडीला लागण्याची वेळ आल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी या बैठकीत सांगितले. या पार्श्वभूमीवर संबंधित विकसकांवर कायदेशीर कारवाई करून म्हाडाने तो ताब्यात घ्यावा, अशी भूमिकाही पवार यांनी या वेळी मांडली.

गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी ही सर्व वस्तुस्थिती जाणून घेत इतक्या लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा अतिशय गंभीर विषय असल्याचे या वेळी नमूद केले. तसेच हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जी काही कार्यवाही करणे आवश्यक आहे, ती करण्याचे आश्वासनही त्यांनी उपस्थित रहिवाशांना दिले, तर रहिवाशांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवरही कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात लवकरच संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पुढील बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com