मालमत्ता कर विभागाचे कामकाज १५ दिवसांपासून ठप्प

मालमत्ता कर विभागाचे कामकाज १५ दिवसांपासून ठप्प
Published on

उल्हासनगर, ता. ११ (बातमीदार) : आमदार कुमार आयलानी यांच्यासोबत शिष्टमंडळाने शहरातील विविध समस्यांच्या गाऱ्हाणी मांडली. याप्रसंगी भाजपचे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दीपक छतलानी यांनी मालमत्ता कर विभागाच्या कर निर्धारक व संकलक नीलम कदम यांची बदली झाल्यापासून विभागाचे कामकाज १५ दिवसांपासून ठप्प पडल्याबाबत अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांचे लक्ष वेधले आहे.
रस्त्यांचे खोदकाम सर्वत्र करण्यात आले आहे. त्याला गती देण्यात यावी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी खोदलेले रस्ते काम पूर्ण झाल्यावरही तत्काळ भरले जात नाही. त्यामुळे खोदकाम केल्यानंतर बाहेर ठेवलेली माती ही रस्त्यावर येत आहे. पावसात या मातीचे चिखलात रूपांतर होत असून, त्यामुळे नागरिकांना चालणे मुश्कील होत आहे, आदी समस्या मांडण्यात आल्या. याप्रसंगी छतलानी यांनी नीलम कदम यांची बदली झाल्यानंतर १५ दिवसांपासून मालमत्ता कर विभागात नागरिकांची कोणतीही कामे पूर्ण होत नाहीत. त्यामुळे त्यांना माघारी जावे लागत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्तांनी दिली. यावेळी आमदार आयलानी, माजी नगरसेवक लाल पंजाबी, महेश सुखरामानी, डॉ. प्रकाश नाथानी, किशोर वनवारी, राजू जग्याशी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com