बेकादाय मोबाइल कॅटरिंगचा धोका

बेकादाय मोबाइल कॅटरिंगचा धोका
Published on

बेकायदा मोबाईल केटरिंगचा धोका
ऐरोलीतील घटनेमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ; पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष
वाशी, ता. ११ (बातमीदार) ः ऐरोली रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेस चायनीज बनवणाऱ्या टेम्पोमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे मोबाईल केटरिंगअंतर्गत अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या टेम्‍पो व्‍यावसायिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र भविष्यात दुर्घटना होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्‍यामुळे पोलिस प्रशासनाकडून याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
नवी मुंबईत मागील काही दिवसांपासून मोबाईल केटरिंगला चांगले दिवस आले आहेत. ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, जुईनगर, सीबीडी बेलापूरसह औद्योगिक पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल केटरिंग सुरू आहे. पदपथावर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर पालिका दंड आकारते. त्‍यामुळे मागील काही वर्षांपासून मोबाईल केटरिंगला सुगीचे दिवस आले आहेत. या मोबाईल केटरिंगसाठी शासनाकडून परवाना मिळतो. तीन किंवा चार चाकी टेम्‍पोमध्ये अशा प्रकारे मोबाईल केटरिंगचा व्‍यवसाय केला जातो, मात्र यामध्ये सिलिंडर ठेवण्यास मनाई आहे. तरीदेखील अनेक जण कायदा न जुमानता सर्रास सिलिंडरचा वापर करतात. त्‍यामुळे नवी मुंबईतील पदपथावर अशा प्रकारे धोकादायक मोबाईल केटरिंग बिनदिक्‍कत सुरू आहे, मात्र नुकतेच ऐरोली येथे अशा चायनीज खाद्यपदार्थ बनवणाऱ्या टेम्‍पोमध्ये सिलिंडराचा स्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र शहरातील नागरिकांसाठी धोक्‍याची घंटा वाजवून गेली. अशा प्रकारे बेकायदा मोबाईल केटरिंग करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे, मात्र याबाबत पोलिस प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे.
..........................
टेम्पोमध्ये सिलिंडरसारखे ज्वलनशील पदार्थ तसेच वाहतुकीस अडथळा होईल, अशा ठिकाणी वाहन पार्क केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. तसेच रस्त्यावर हातगाडीवाल्यांनी सिलिंडर वापरल्यास त्यांच्यावरदेखील कारवाई करण्यात येत असते. गतवर्षात नवी मुंबई क्षेत्रात ५५० जणांवर कारवाई केली आहे.
-पंकज डाहणे, उपआयुक्त, नवी मुंबई पोलिस
....................
आरटीओमधून अशा टेम्‍पोला मोबाईल केटरिंग म्हणून परवानगी देण्यात येते, मात्र व्‍यवसाय कुठे करावा, याबाबत परवानगी देण्यात येत नाही. तसेच ज्वलनशील पदार्थ बाळगल्यास पालिकेने अशा वाहनांवर कारवाई करावी.
-दत्तात्रया सांगोलकर, उपप्रादेशिक परिवहन आधिकारी, नवी मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com