मुंब्र्यातून लोंबकळत प्रवास

मुंब्र्यातून लोंबकळत प्रवास
Published on

किरण घरत ः सकाळ वृत्तसेवा
कळवा, ता. ११ ः मुंब्रा स्थानकात लोकलमधून पडून चौघांचा मृत्यू झाला होता, तर नऊ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे गर्दी असलेल्या स्थानकांची चर्चा सुरू झाली असून, मुंब्रा, कौसा, शीळ-डायघर भागातील लोकसंख्येमुळे मुंब्र्याची ‘धोकादायक स्थानक’ अशी ओळख झाली आहे.
मुंब्रा स्थानकातून छोटे मोठे व्यावसायिक, नोकरदार ठाणे, मुंबई येथे मोठ्या प्रमाणात प्रवास करतात, मात्र प्रवाशांच्या तुलनेत मुंब्रा रेल्वेस्थानकात सोयीसुविधांची वानवा आहे. मुंब्रा बाजारपेठ तसेच रिक्षा स्टँडला लागूनच असलेल्या या स्थानकाचे तिकीटघर फलाट क्रमांक चारला आहे. या ठिकाणी दिवसभर प्रवाशांच्या रांगा लागल्याचे चित्र असते. तिकीट खिडक्यांबरोबर व्हेंडिंग मशीनवरही प्रचंड गर्दी असते. सकाळ, संध्याकाळ स्थानकावर असलेल्या गर्दीमुळे प्रवाशांना लोंबकळत प्रवास करावा लागतो. त्यामुळे दुपारी तरी स्थानकातून निवांत बसून प्रवास करता येईल, अशी अपेक्षा असते, मात्र या स्थानकातून एकही स्वतंत्र्य गाडी सुटत नसल्याने प्रवाशांच्या नशिबी गर्दीतून प्रवासाची वेळ आली आहे.
--------------------------------------
सुविधांची वानवा
- फलाट क्रमांक चारवर पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. रेल्वेस्थानकाला लागूनच रिक्षा तसेच बसस्थानकाचे काम सुरू असल्याने घाणीचे साम्राज्य आहे. प्रवाशांना बसण्यासाठीची व्यवस्था फलाटावर नसल्याने गैरसोय होत आहे. फलाट क्रमांक चार लोकवस्तीला लागून असल्याने जलद गतीने जाणाऱ्या लोकलमुळे प्रवाशांना जिने चढून फलाट क्रमांक दोन, तीन गाठावे लागते.
- दिवा व मुंब्रा यादरम्यान गेल्या काही वर्षांत लोकलमधून पडून प्रवाशांचा अपघात झाला आहे. या घटनांमध्ये अनेकांचे मृत्यू झाले आहेत. दिवा स्थानकापासून गर्दीला सुरुवात होत असून, कल्याण-डोंबिवलीवरून येणाऱ्या गाड्या भरलेल्या असल्याने सकाळच्या सत्रात गाडीत जागा मिळत नाही. त्यातच मुंब्रा स्थानकाआधी काही ठिकाणी वळणदार ट्रॅकमुळे गाडी थोडी झुकत असल्याने अपघात होतात.
------------------------------------------
मुंब्र्यातून गर्दीच्या वेळी स्वतंत्र गाडी सुटत नसल्याने अपघात होतात. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी फेऱ्या वाढवण्याची गरज आहे.
- सय्यद काझी, प्रवासी
------------------------
मुंब्रा स्थानकात सकाळच्या सत्रात प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. या वेळेत तिकिटासाठीची मशीनची संख्या वाढवली पाहिजे. जेणेकरून स्थानकावरील गर्दी कमी होईल.
- प्रकाश भोईर, प्रवासी, मुंब्रा
---------------------------------------
कळवा, मुंब्रा रेल्वेस्थानकातून सकाळच्यावेळी मुंबईसाठी स्वतंत्र गाडी सुरू करण्यासाठी अनेकवेळा प्रवासी संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला आहे, मात्र रेल्वे प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही.
- सिद्धेश देसाई, उपाध्यक्ष, मुंबई रेल्वे प्रवासी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com