भाडे थकवलेल्या मालमत्ता पालिका ताब्यात घेणार

भाडे थकवलेल्या मालमत्ता पालिका ताब्यात घेणार
Published on

भाडे थकवलेल्या मालमत्ता पालिका ताब्यात घेणार
तुर्भे, ता. ११ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्तांचा ताबा घेण्यात यावा, अशा सूचना मालमत्ता विभागाच्या वतीने संबंधित पालिका विभाग अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याबाबतचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्यात यावा, असे आदेश विभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नुकतेच महापालिकेच्या रिक्त मालमत्तांमध्ये दारूची पार्टी रंगली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यामुळे महापालिकेच्या रिक्त आलेल्या मालमत्तांचा गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची दखल घेत पालिकेने आपल्या इतर मालमत्तांकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्‍यानुसार आता भाडे थकविलेल्या मालमत्ता पालिका ताब्यात घेणार आहे.
नवी मुंबई महापालिकेने विकसित केलेले समाजमंदिर, व्यायामशाळा, महिला कम्युनिटी सेंटर, बहुउद्देशीय इमारती, सांस्कृतिक भवन, नागरिक संस्था यांना सर्वसाधारण सभेने वेळोवेळी केलेल्या ठरावानुसार भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या कोणत्याही जागेचे भाडे जर दोन किंवा अधिक महिने थकवले गेले, तर अशा व्यक्तींना या जागेतून काढून टाकण्याची कार्यवाही प्रशासन करू शकते. तसे अधिकार पालिकेला आहेत. दरम्यान, महापालिकेने समाजमंदिर, व्यायामशाळा, बाजार संकुलासह अनेक संस्थांना भाडेतत्त्वावर जागा दिलेल्या आहेत. मात्र यातील काही संस्थांनी भाडे थकविले आहे. त्‍यांना वारंवार भाडे भरण्याबाबत नोटीस बजावूनही त्‍याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शिवाय सानपाडा येथील पालिकेच्या जागेत मद्य पार्टी रंगली होती. त्‍यामुळे पालिकेने अशा मालमत्तांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्‍यामुळे अद्याप ज्या मालमत्ताधारकांनी भाडे भरणा केलेला नाही व त्यांचे करारनामे संपुष्टात आलेले आहेत, अशांच्या मालमत्ता सील करण्यात याव्यात आणि त्याबाबतचा अहवाल सात दिवसांत महापालिका मालमत्ता विभागाकडे पाठवण्याच्या सूचना विभाग अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com