महापालिका क्षेत्रात संख्या वाढविण्याची नागरिकांची मागणी

महापालिका क्षेत्रात संख्या वाढविण्याची नागरिकांची मागणी
Published on

महापालिका क्षेत्रात संख्या वाढविण्याची नागरिकांची मागणी
शेतकरी आठवडा बाजाराला प्रतिसाद
नेरूळ, ता. ११ (बातमीदार) ः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपला माल थेट शहरात आणून विक्री करता यावा, यासाठी शासनाने २०१६ रोजी संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडा बाजाराला सुरुवात केली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रामधील या आठवडा बाजाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र त्‍याची संख्या कमी असल्याने ती वाढविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांची ताजी भाजी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने शेतकरी व ग्राहकांचे हित लक्षात घेता १२ ऑगस्ट २०१६ रोजी संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडे बाजार सुरू केला. पहिल्या टप्प्यात मुंबई, नवी मुंबई, पुणे येथे प्रत्येक विभागात एक दिवस शेतकरी आठवडे बाजार भरवण्याचे निश्चित केले. त्याला नवी मुंबई शहरात अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नेरूळ, बेलापूर, सिवूड्स, वाशी आदी भागात भरणाऱ्या शेतकरी आठवडी बाजारात पुणे, भोर, आंबेगाव, जुन्नर, राजगुरुनगर आदी भागातील शेतकरी भाजीपाला व फळे विक्रीसाठी घेऊन मोठ्या संख्येने येतात. आठवडी बाजारात किरकोळ व्यापाऱ्यांकडे मिळणाऱ्या भावापेक्षा कमी भावात व ताजा भाजीपाला, फळे मिळत असून या बाजाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
परंतु शहरात अद्याप काही ठिकाणी आठवडे बाजार सुरू झाले नाहीत. त्‍यामुळे अनेक विभागात अशा प्रकारे आठवडी बाजार सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शेतकरी आठवडी बाजारात नागरिकांना मिळणारा भाजीपाला स्वस्त दरात मिळत असल्याने त्‍याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या आठवडी बाजारांची व्याप्ती वाढल्यास त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे. शेतकरी आठवडा बाजार पूर्वी पणन मंडळाच्या माध्यमातून सुरू करण्यात आले होते. आता हा उपक्रम कृषी विभागाकडे आहे. नवी मुंबई शहरातील शेतकरी आठवडा बाजाराच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना स्वस्त दरात कृषिमाल उपलब्ध करून देणे शक्य आहे. परंतु नवी मुंबई महापालिका क्षेत्रात बाजारांची संख्या अत्यंत कमी आहे.
.......................
आम्ही शेतातील ताजी भाजी शासनाच्या उपक्रमाप्रमाणे शेतकरी आठवडा बाजारात नवी मुंबईत आणतो. पालिकेच्या माध्यमातून जागा निश्चित करून दिल्या आहेत. शेतकरी आठवडा बाजाराला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. त्याची व्याप्ती वाढल्यास थेट नागरिकांना फायदा होणार आहे.
-जितेंद्र बाळासाहेब, शेतकरी आठवडा बाजार, जुन्नर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com