पंधरा सोसायट्यांची सांडपाणी प्रवासातून सुटका

पंधरा सोसायट्यांची सांडपाणी प्रवासातून सुटका
Published on

अंबरनाथ, ता. ११ (वार्ताहर) : गेल्या वर्षभरापासून वडली विभागातील १२ ते १५ सोसायट्यांमधील रहिवासी सांडपाण्यातून प्रवास करत नव्हते; तर त्याच घाणीमध्ये राहत आहेत. या सोसायट्यांमध्ये सांडपाण्याचे जणू तळे साचले आहे. काही महिने तर नागरिकांनी स्वखर्चाने पाणी मोटारीने उपसून काढले. मात्र, आता नागरिकांची यातून सुटका होणार असून, पालिकेने सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे. पूर्वीची जुनी सहा इंची वाहिनी तोडून नवीन एक फुटाची बसवण्याचे काम सुरू केले आहे. यातील ७० टक्के काम झाले असून, उर्वरित ३० टक्के लवकरच करून नागरिकांना पावसाळ्यापूर्वी या त्रासातून मुक्ती मिळवून देऊ, असे शहर अभियंता राजेश तडवी यांनी सांगितले.
अंबरनाथ पूर्व वडवली विभागात बालाजी पार्क, श्री, जठार; तसेच इतर आणखी बारा अशा पंधरा रहिवासी सोसायट्यांमध्ये सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. तीन ते चार मजल्याच्या या १५ इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक राहत आहेत. सोसायटी आवारात साचलेल्या या सांडपाण्यातूनच रहिवासी प्रवास करत आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून दुर्गंधीमुळे श्वासही गुदमरला होता. रहिवाशांनी स्वखर्चाने पाणी मोटारच्या साह्याने काढून टाकले होते. मात्र, तरीही समस्या सुटत नसल्याने नागरिकांनी या संदर्भात पालिकेला वारंवार तक्रारी केल्या. त्यानंतर पालिकेने सांडपाण्याची जुनी ६ इंची वाहिनी तोडून त्या ठिकाणी नवी एक फूट इंचाची वाहिनी टाकण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांना या त्रासातून मुक्ती मिळणार आहे.

जुनी सांडपाणी वाहिनी १९८६ मध्ये शहरात टाकण्यात आली होती. त्या वेळी कोणतेही नियोजन नसल्याने आणि तीन ते चार मजली इमारती बांधकामांना परवानगी असल्याने ६ इंचाच्या सांडपाणी वाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. मात्र, सध्याचे वाढते शहरीकरण पाहता योग्य नियोजन करून एक फुटाची वाहिनी टाकण्याचे काम सुरू केले आहे. हे काम ७० टक्के झाले आहे. उर्वरित ३० टक्के काम लवकरच पूर्ण करून नागरिकांची या समस्येतून सुटका होणार आहे.
- राजेश तडवी, शहर अभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com