विरारच्या यशवंत नगरमध्ये पिकलबॉल खेळाचे मैदान

विरारच्या यशवंत नगरमध्ये पिकलबॉल खेळाचे मैदान
Published on

नालासोपारा (बातमीदार) : कलबॉल खेळताना जलद हालचाली आणि रॅलीमुळे हृदयाची गती वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. नियमित खेळल्याने रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. एका आठवड्यातून तीन दिवस दररोज एक तास खेळणाऱ्यांच्या हृदयाचे आरोग्य सुधारते. पिकलबॉल खेळताना पाय, हात आणि पोटाचे स्नायू कार्यरत होतात. यामुळे स्नायूंची ताकद आणि लवचिकता वाढते. खेळातील जलद हालचाली संतुलन आणि समन्वय सुधारते, असे प्रतिपादन माजी महापौर राजीव पाटील यांनी केले. या खेळाचे मैदान विरार येथील यशवंतनगरमध्ये विकसित करण्यात आले आहे. या मैदानाचे मंगळवारी (ता. १०) उद्‍घाटन करण्यात आले आहे. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी पिकल बॉल संघटनेचे अध्यक्ष सुधीर वालावलकर, माजी महापालिका आयुक्त कल्याण केळकर, माजी स्थायी समिती सभापती जितूभाई शाह, अजीव पाटील, डॉ. प्रवीण क्षीरसागर, अमेय क्लासिक क्लबच्या संचालिका ग्रीष्मा पाटील-पोटे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com