पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाचे अपहरण

पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाचे अपहरण
Published on

पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाचे अपहरण
मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ : पूर्ववैमनस्यातून एका अल्पवयीन मुलाचे चार तरुणांनी अपहरण केल्याची घटना सोमवारी (ता. ९) रात्री घडली. यामध्ये मोटारीमधून भोपर परिसरात मुलाला नेऊन बेदम मारहाण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच ‘यापुढे आमच्या वाटेला गेलास तर तुझ्या वडिलांनाही सोडणार नाही,’ अशी धमकी त्याला देण्यात आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

डोंबिवली पूर्वेतील भोपर गाव हद्दीत राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलाचे काही दिवसांपूर्वी सुनीलनगरमध्ये राहणाऱ्या तरुणासोबत वाद झाला होता. या वादातून सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पीडित मुलगा आपल्या घराजवळील खासगी शिकवणी वर्गात गेला होता. या वेळी तो काही कारणासाठी खाली येताच संधी साधून सुनीलनगरमधील तरुण आणि त्याच्या तीन साथीदारांनी या पीडित मुलाला जबरदस्तीने एका मोटारीत बसवले. या वेळी या मुलाने जोरजोरात आरडाओरडा केला; मात्र कोणीही मदतीला धावून आले नाही. आरोपींनी त्याला मारहाण करीत मोटारीत टाकले आणि भोपर गावाच्या हद्दीत नेले. तेथे त्याला शिवीगाळ करीत बेदम मारहाण करण्यात आली आणि एकाने त्याच्यावर धारदार वस्तूने हल्ला केला. यानंतर त्याला पुन्हा मोटारीत बसवून डी मार्ट परिसरात सोडून देण्यात आले. पीडित मुलाने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी मानपाडा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.


..
आरोपींचा शोध सुरू
घटनेची माहिती देताना मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी सांगितले, की ‘चार अनोळखी तरुणांनी पीडित मुलाचे अपहरण करून त्याला धमकावले. प्राथमिक तपासात त्याच्यावर कोणताही गंभीर वार झालेला नाही. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com