

रस्त्यांवर केबल्सचे जाळे
कल्याण, ता. ११ (बातमीदार) : दहा वर्षांपासून कल्याण शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत अनेक प्रकल्प सुरू आहेत. स्मार्ट शहराचे रस्तेदेखील स्मार्ट करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे; मात्र याच स्मार्ट रस्त्यावरून गेलेल्या केबल्स वाहनचालकांसाठी अडथळे निर्माण करीत असून, अपघाताची भीती वर्तविण्यात येत आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांसह काही मुख्य रस्त्यांवर केबल्सचे जाळे पसरले आहे.
सर्वोदय मॉलसमोरील रस्त्याकडेला असलेल्या झाडावरून तुटलेली एक केबल हवेत लटकली आहे. ही केबल रस्त्यावर लटकत असल्याने या वायरीमुळे एखाद्या दुचाकीस्वाराला फासदेखील लागू शकतो किंवा डोळ्याला फटका बसून इजा पोहोचू शकते. अशी एक नव्हे अनेक केबल्स शहरातील रस्त्यांवर पसरल्या आहेत. बरेचदा या केबल्स रस्त्यावरही लोळण घेतात. यामुळे या केबल्स नकळतपणे धावत्या वाहनांच्या चाकात अडकून दुर्घटना होण्याचीही शक्यता असते.
रस्त्यावर पसरलेल्या केबल्स या विविध प्रकारच्या असतात. यातील काही विद्युत वितरण करणाऱ्या असतात, तर काही केबल कनेक्शन तसेच इंटरनेट पुरवठा करणाऱ्या खासगी कंपन्यांच्यादेखील असतात. त्यामुळे रस्त्यावर येतील अशा ठिकाणी केबल्स पसरवण्यावर अंकुश लावावा, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.