अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना वेतन द्या

अतिरिक्त ठरलेल्या 
शिक्षकांना वेतन द्या
Published on

अतिरिक्त ठरलेल्या
शिक्षकांना वेतन द्या
मुंबई मुख्याध्यापक संघटनेची मागणी
मुंबई, ता. ११ : मुंबई आणि परिसरात संचमान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे वेतन काही दिवसांपासून रखडलेले आहे. त्यांचे वेतन तातडीने सुरू करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालकांकडे केली आहे.
मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे मुंबईतच समायोजन व्हावे व त्यांचे बंद झालेले वेतन तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी यांनी शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. या भेटीत मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन मुंबई महापालिकेतील शाळांत करण्यात यावे, तसेच मागील महिन्यापासून शिक्षकांचे थांबवलेले वेतन तातडीने सुरू करावे, आदी मागण्यांचे निवेदन त्यांनी दिले.

संचमान्यतेत मुंबईतील शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यांचे समायोजन ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागात करण्यात आले होते. या समायोजनाला शिक्षकांनी विरोध दर्शवला होता. मुंबईत मुंबई महापालिकेच्या शाळांत शिक्षकांच्या शेकडो जागा रिक्त आहेत. या शाळांत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केल्यास मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न सुटू शकतो. तसेच मुंबई महापालिकेतील शिक्षकांची पदे रिक्त असलेल्या शाळांत खासगी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होऊ शकते, असा दावाही बोरनारे यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com