

काँग्रेसतर्फे आज
राज्यभर मशाल मोर्चे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून राज्यात भाजप युती सरकार सत्तेत आले आहे. यात निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागली आहे. लोकशाही व्यवस्थेवर हा घाला आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसतर्फे गुरुवारी (ता. १२) राज्यभर मशाल मोर्चे काढून जनजागृती करण्यात येणार आहे.
लोकशाही व्यवस्था अबाधित राहावी व निवडणूक आयोगावर निर्माण झालेले हे संशयाचे ढग दूर करण्यासाठी विधानसभा निवडणुकीतील मॅच फिक्सिंगची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गडचिरोलीतील आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनात पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाग घेतील, अशी माहिती प्रदेश काँग्रेसने दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.