तृतीयपंथीयांच्या विविध समस्यांसाठी राज्यभरात बैठका

तृतीयपंथीयांच्या विविध समस्यांसाठी राज्यभरात बैठका
Published on

तृतीयपंथींच्या विविध समस्यांसाठी राज्यभरात बैठका
मुंबई, ता. ११ : तृतीयपंथींच्या विविध समस्या सोडवण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून, त्यासाठी तृतीयपंथींच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मंडळाच्या सदस्यांना बैठका आणि प्रवासासाठी मानधन देण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.
विश्रामगृहामध्ये निवासाची सोय करण्यात येईल. तसेच मुंबईमध्ये कार्यालयासाठी जागा देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाची पहिली बैठक मंत्रालयात झाली. आमदार बालाजी किणीकर, आनंद बोंढारकर, अमोल मिटकरी, विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, मंडळाच्या उपाध्यक्ष डॉ. सान्वी जेठवानी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com