

कोयत्याने वार करून मित्राची हत्या
भाईंदर, ता. ११ (बातमीदार) : शेजाऱ्यांच्या देखत मित्राची कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना भाईंदर पश्चिम येथील मुर्धा खाडी परिसरात बुधवारी (ता. ११) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या हत्येनंतर आरोपी हा फरार झाला आहे.
भाईंदर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘संजय शर्मा हा मुर्धा खाडीजवळील एका चाळीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून भाड्याने राहत असून तो रंगकाम करतो. दोन दिवसांपूर्वी त्याचा मित्र अनिस नबी खान त्याच्याकडे राहायला आला होता. या दोघांमध्ये बुधवारी पहाटे कडाक्याचे भांडण झाले. या वादातून संजय याने अनिस याच्यावर कोयत्याने हल्ला चढवला. भांडणाच्या आवाजाने जागे झालेल्या आसपासच्या रहिवाशांनी संजयला आवरण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना कोयत्याचा धाक दाखवत त्याने अनिसवर वार करणे सुरूच ठेवले व त्याची हत्या करून तो तेथून पळून गेला,’ अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी दिली. याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरारी संजयचा शोध सुरू करण्यात आला आहे. या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.