कोपरखैरणेत पत्नीची निघृण हत्या

कोपरखैरणेत पत्नीची निघृण हत्या
Published on

कोपरखैरणेत पत्नीची निर्घृण हत्या
हत्येनंतर नस कापून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : कोपरखैरणे सेक्टर १९ मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर चाकूने वार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (ता. ११) सकाळी घडली. पत्नीच्या हत्येनंतर या आरोपी पतीने स्वत:च्या हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या हत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसले तरी कौटुंबिक कारणावरून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कोपरखैरणे पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गौरी गणेश शिरसाट (वय ३४) असे या घटनेतील मृत विवाहितेचे नाव असून पतीचे नाव गणेश मारुती शिरसाट (३८) असे आहे. हे दोघेही आपल्या दोन मुलांसह कोपरखैरणे सेक्टर १९ मधील जय अंबे इमारतीत राहत होते. गौरी एका खासगी रुग्णालयामध्ये परिचारिका म्हणून काम करीत होती; तर पती गणेश हा बेरोजगार आहे. या दाम्पत्यामध्ये बुधवारी सकाळी भांडण झाले. या भांडणानंतर संतप्त झालेल्या गणेशने गौरीवर चाकूने असंख्य वार करून तिची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:च्या हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याच भागात राहणारी गौरीची मैत्रीण वैशाली पाटील ही गौरीच्या मोबाईल फोनवर वारंवार संपर्क साधत होती; मात्र गौरीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तिने गौरीचे घर गाठले. या वेळी घरामध्ये गौरी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे व तिचा पती तिच्या शेजारी बसल्याचे तिच्या निदर्शनास आले.

..
हत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट
घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी गणेशला मुंबईतील जे. जे. रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची प्रकृती सुधारल्यानंतर त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली. या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कौटुंबिक कारणावरून हा प्रकार घडला असावा, अशी शक्यताही पाटील यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com