पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना बी.टेक पदवी

पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना बी.टेक पदवी
Published on

पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना बी.टेक. पदवी
बीट्स पिलानीतून मिळाली संधी; प्रमुख उद्योग समूहांचे सहकार्य
मुंबई, ता. ११ : अभियांत्रिकीच्या पदवीचे शिक्षण आयआयटी मुंबईसह बीट्स पिलानी या संस्थेतून करण्याचे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. तंत्रशिक्षण संचालनालयाने अभियांत्रिकीच्या तंत्रनिकेतन पदविकेच्या (पॉलिटेक्निक) विद्यार्थ्यांना विविध उद्योग समूहांच्या सहकार्याने बीट्स पिलानीत बी.टेक.चे शिक्षण घेण्याची संधी दिली आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच विद्यावेतन आणि लाखो रुपयांचे वार्षिक पॅकेजही मिळाले आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाने देशातील टाटा, विप्रो, एल अँड टी अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत कमवा व शिका या योजनेअंतर्गत उपक्रम राबवला होता. त्यातून विद्यार्थ्यांना बीट्स पिलानीसारख्या देशातील नामांकित संस्थेत बी.टेक. करण्याची संधी मिळाली आहे. यात नागपूर आणि गोंदिया येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थी चर्चेत आले आहेत.

विप्रो लिमिटेड यांनी २०२३मध्ये स्कूल फॉर आयटी इन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट ही विशेष योजना सुरू केली होती. विप्रोच्या त्या योजनेचे रूपांतर पुढे विप्रो प्रायोजित बी.टेक. (इन्फॉरर्मेशन सिस्टीम) या पदवीत करता आले. यात निवडलेल्या विद्यार्थ्यांना विप्रोत पूर्णवेळ कर्मचारी म्हणून काम करीत असताना ही पदवी पूर्ण करण्याची संधी मिळते. त्यांना स्कॉलर ट्रेनी सीआयएम म्हणून सामील करून घेतले जात आहे. बीट्स पिलानीसारख्या संस्थेत नागपूर, गोंदियातील विद्यार्थ्यांना बी.टेक. करण्याची संधी मिळाली आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहीतकर यांनी दिली.
--
टाटाची लक्ष्य प्रोग्राम योजना
टाटा मोटर्स लिमिटेडने ‘लक्ष्य प्रोग्राम’ ही योजना २०२४ व २०२५ मध्ये डिप्लोमा इन इंजिनिअरिंग पदवीधर विद्यार्थ्यांसाठी सुरू केली. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना टाटा मोटर्समध्ये काम करीत असतानाच बीट्स पिलानी येथून इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी या शाखेतून बी.टेक.ची पदवी घेण्याची संधी मिळाली.
--
निवडीनंतर असे मिळाले पॅकेज
- २०२२-२३ मध्ये विप्रो लिमिटेडने संगणक अभियांत्रिकीमधील तीन विद्यार्थी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधील एक विद्यार्थी आणि माहिती तंत्रज्ञानमधील एका विद्यार्थ्याला बी.टेक.मधील प्रवेशाची संधी दिली. या विद्यार्थ्यांना २.२५ लाख वार्षिक पॅकेज मिळाले. त्यासह बीट्‌स पिलानी येथील बी.टेक.मध्ये प्रवेश दिला.
- २०२३-२४ मध्ये टाटा मोटर्स लिमिटेडने मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील प्रत्येकी एका विद्यार्थ्याची निवड करून त्यांना ३.० लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज आणि सोबतच बीट्स पिलानी येथे बी.टेक.ची संधी दिली.
- २०२४-२५ मध्ये टाटा मोटर्स लिमिटेडने मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमधील एका विद्यार्थ्याची निवड केली. त्याला ३.० लाख वार्षिक पॅकेज आणि बीट्‌स पिलानीमध्ये बी.टेक.मध्ये प्रवेश मिळाला.
--
कोट
पॉलिटेक्निकच्या पदविकेचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बिट्स पिलानीसारख्या देशातील नामांकित संस्थेत जाऊन बी.टेक.ची पदवी संपादन करण्याचे मोठे स्वप्न असते. ते स्वप्न पहिल्यांदाच नागपूर, गोंदिया येथील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे पूर्ण होत आहे. बीट्स पिलानीतील प्रवेशाचा विषयच ऐतिहासिक ठरला आहे.
- डॉ. विनोद मोहीतकर, संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com