लोकवस्तीत दुर्गंधीचे राज्य

लोकवस्तीत दुर्गंधीचे राज्य

Published on

भिवंडी, ता.१५ (बातमीदार): शहरातील जुन्या तसेच नवीन लोकवस्तीतील गटारे, मलनिःस्सारणचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. या बाबत पालिकेकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत आहे. पण पालिकेचे अधिकारी रहिवाशांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याने लोकवस्तीत दुर्गंधी पसरली आहे.
भिवंडीतील उच्चभ्रू लोकवस्ती असलेली मानसरोवर, कासारआळी येथील विष्णुलीला इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर अनेक दिवसांपासून ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. इमारतीसमोरील गटारावरील झाकण तुटलेले असून स्थानिकांच्या तक्रारीनंतरही अधिकारी तसेच ठेकेदारांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. असाच काहीसा प्रकार मानसरोवर परिसरातील वऱ्हाळा तलावाजवळ आहे. याठिकाणी असलेल्या गृहसंकुलात हजारो लोक राहतात. मानसरोवर गेटसमोरील तीन मार्गावरील रस्त्यावर महिन्यांपासून घाणेरडे ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. त्यामुळे रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे. या रस्त्यासमोर आणि आजूबाजूला अनेक विवाह हॉल, मैदाने आहेत. तसेच मानसरोवर, वरला तलावाच्या काठावर फिरायला येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने सांडपाण्यातून पायपीट करण्याची वेळ आली आहे.
-----------------------------------------------------
करदाते वाऱ्यावर
- मानसरोवरच्या नाल्याची स्वच्छता झाली नसल्यामुळे नाला पूर्णपणे तुंबला आहे. यामुळे सोसायट्यांनी पालिका प्रशासनाकडे गटारांच्या दुरुस्तीसाठी विनंती केली आहे. परंतु, ना रस्ता दुरुस्त करण्यात आला, ना नालेसफाई झाली असल्याने स्थानिकांमध्ये संताप आहे.
- जुन्या भिवंडीत वाणीआळी ते कासारआळीपर्यंत गटारे, जलवाहिनी आणि ड्रेनेज यांची दुरुस्ती शिवार आरसीसी बनवलेला आहे. त्यामुळे पालिकेचा मालमत्ता कर भरीत असताना पालिकेचे प्रभाग अधिकारी, बांधकाम व पाणीपुरवठा अधिकारी दुर्लक्ष करतात.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
महापालिकेकडून सर्वेक्षण
मानसरोवर परिसरात अनेक एजन्सींना उत्खनन केले आहे. दरम्यान ड्रेनेज तुंबला असावा. त्यामुळे ड्रेनेजचे घाणेरडे पाणी रस्त्यावर वाहत आहे. ईगल कंपनीला मशिनच्या मदतीने स्वच्छ करण्यास सांगण्यात आले आहे. दोन दिवसांत नाला स्वच्छ केला जाईल. तसेच शहरात जिथे नाल्याचे पाणी रस्त्यावर येत आहे. त्या भागाचे सर्वेक्षण करून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात केल्याचे भिवंडी पालिकेचे बांधकाम विभाग अतिरिक्त शहर अभियंता सचिन नाईक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com