

उल्हासनगर, ता. १६ (वार्ताहर) : शहरातील रस्त्यांवर खड्डे किती धोकादायक ठरू शकतात, याचा प्रत्यय रविवारी (ता. १६) संध्याकाळी उल्हासनगरच्या १७ सेक्शन परिसरात आला. एका दुचाकीवर लहान बाळासह प्रवास करणाऱ्या दाम्पत्याची गाडी रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे घसरली. वाहनाचा वेग कमी असल्याने जीवितहानी टळली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने प्रशासनाच्या निष्काळजीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उल्हासनगरच्या कल्याण-बदलापूर रोडवरील १७ सेक्शन परिसरातून हे दाम्पत्य आपल्या लहान बाळासह दुचाकीवरून प्रवास करत होते. रस्त्यावरील असमतोल सिमेंटचा पॅच आणि त्यालगत असलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीचा तोल सुटला आणि हे तिघे रस्त्यावर फेकले गेले. बाळ आईच्या हातातच होते. यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. उल्हासनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्वतः गाडी चालवून या रस्त्यांवरून फिरावे, म्हणजे त्यांना जनतेला होणारा त्रास आणि दुःख समजेल, असा सूर वाहनचालकांमध्ये उमटत आहे. दरवर्षी पावसाळ्यात हीच स्थिती निर्माण होते; मात्र ठोस उपाययोजना होत नाहीत. लहान बाळाच्या जीवाशी खेळ झाल्यावरही प्रशासन डोळेझाक करत असेल, तर ती प्रशासनाची निर्ढावलेली वृत्ती मानली पाहिजे, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.