पाणीच पाणी चोहीकडे

पाणीच पाणी चोहीकडे
Published on

पाणीच पाणी चोहीकडे
वसई-विरारमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग
वसई, ता. १६ (बातमीदार) : वसई-विरार शहरांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दोन दिवसांपासून पाऊस बरसत असल्याने अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. महामार्गावरदेखील पाणी साचले आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा काम करताना दिसत आहे. मॉन्सूनपूर्व कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासकीय यंत्रणांकडून करण्यात आला होता; मात्र पहिल्याच पावसात शहरात पाणी साचल्याने पालिकेचा दावा फोल ठरला आहे.

वसई-विरार शहरांत एक लाख ७२ हजार ५७० मीटर लांबीचे छोटे-मोठे २०५ नाले आहेत. पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी खबरदारी घेतली जाईल, असा विश्वास जनतेला देण्यात आला होता. मात्र मुसळधार पावसात अनेक रस्ते जलमय झाले. त्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. नालासोपारा पूर्वेकडील गाला नगर, संतोष भुवन, तुळिंज, ओसवाल नगरी सेंट्रल पार्क भागात पाणी साचले आहे, तर वसई येथील सोपारा, गास मार्ग, निर्मळ, भुईगाव मार्ग यासह अनेक भागांतील रस्त्यांवर पाणी साचले आहे.

वसईची तुंबई
मान्सूनपूर्व काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधींनी नालेसफाईच्या कामांची पाहणी केली होती. सूचना करून कामे करण्यासाठी यंत्रणा राबबवण्यात आली; तरीही वसईची तुंबई झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरदेखील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. या पाण्याचा निचरा व्हावा व वाहतूक सुरळीत असावी, यासाठी पंपाच्या सहाय्याने पाणी उपसा केला जात आहे. यापुढेही पावसाची बॅटिंग सुरूच राहणार असल्याने वसईत पाणी तुंबण्याची भीती व्यक्त होत आहे.
-------------------
वसई : नालासोपारा पूर्वेकडे पावसामुळे वाहनांना मार्गावरून जाताना कसरत करावी लागत आहे.
वसई : निर्मळ-भुईगाव मार्गावर पावसाचे पाणी साचले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com