

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता.१६ : दहाव्या मजल्यावर आगीत अडकलेल्या एका तरुणासह श्वानाला वाचवण्यात ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. या घटनेत तरुण किरकोळ भाजल्याने खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत
वागळे इस्टेट, रघुनाथ नगर येथील मित्तल पार्क परिसरातील प्रकृती पार्क इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील रमेश मोहिलेदेवा यांच्या घराला रविवारी (ता.१५) रात्री आग लागल्याची माहिती स्थानिक माजी नगरसेविका मीनल संख्ये यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, महावितरणच्या कर्मचारी, महानगर गॅस कर्मचारी घटनास्थळी धाव केली. यावेळी घरात अडकलेल्या ओझससह त्याच्या पाळीव श्वानाची सुटका करण्यात आली. आग लागल्याने घरातील फर्निचर इलेक्ट्रिक साहित्य, इलेक्ट्रॉनिक साहित्य व वायरिंग जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावणे अकराच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात पथकाला यश आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.