

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १६ : दिवसभर सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेने वाशी येथे भिंत कोसळून चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. ऐरोली, दिघा, नेरूळ या भागांत सहा ठिकाणी झाडांची पडझड झाली. सकाळी पावसाने चांगला जोर धरला होता. सायंकाळी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत ४० मिमी पावसाची नोंद झाली.
वाशी सेक्टर १७ येथी वाशी प्लाझा सोसायटीजवळील नाल्यावर बांधलेली संरक्षक भिंत कोसळली. भिंतीच्या खालील जमीन खचल्यामुळे भिंत आतील भागात कलंडली. या घटनेमध्ये भिंतीच्या कडेला उभी केलेली चारचाकी आणि दुचाकी वाहने खचलेल्या भागात रुतून बसली. भिंतीजवळ उभा असलेला टेम्पोही या खचलेल्या खड्ड्यात अडकून पडला. वाशी प्लाझा ही वाणिज्य प्रकारातील इमारत असून, दिवसभर या इमारतीमध्ये नागरिकांची आणि व्यावसायिकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे हा परिसर गजबजलेला असतो. घटना घडली तेव्हा भिंतीच्या शेजारी असणारे झाडही कोसळले. इमारतीमधून बाहेर पडणारे नागरिक या झाडाखाली सापडले नाहीत. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेत खचलेल्या भागात रुतलेली वाहने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जुईनगर रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर झाड कोसळले. महापालिकेच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून झाड कापून रस्ता मोकळा केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.