

यूपीआय व्यवहार अधिक जलद
दिवसातून ५० वेळा शिल्लक तपासण्याची सुविधा
नवी दिल्ली, ता. १६ : युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआयद्वारे करण्यात येणारे व्यवहार आता अधिक जलद झाले आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) पेमेंटसाठी प्रतिसाद वेळेत १० सेकंदांपर्यंत कपात करण्याची सक्ती केली आहे.
‘यूपीआय’ ही ‘एनपीसीआय’ने मोबाईल फोनद्वारे आंतरबँक व्यवहार सुलभ करण्यासाठी विकसित केलेली पेमेंट यंत्रणा आहे. ‘एनपीसीआय’च्या परिपत्रकानुसार, पैसे हस्तांतरण, स्थिती तपासणी आणि फेरव्यवहार करणे यासारखे व्यवहार आता ३० सेकंदांऐवजी १० ते १५ सेकंदांत पूर्ण होतील. आजपासून पत्ता पडताळणीसाठी ‘यूपीआय’ पेमेंटमध्ये लागणारा वेळ आता १५ सेकंदांच्या तुलनेत फक्त १० सेकंद लागेल. ग्राहकांचा अनुभव सुधारण्याच्या उद्देशाने प्रतिसाद वेळेत सुधारणा करण्यात आली आहे. ग्राहकांना लवकरच त्यांच्या ‘यूपीआय’ ॲपद्वारे दिवसातून ५० वेळा त्यांच्या खात्यातील शिल्लक तपासता येईल. सध्या एका दिवसात खात्यातील शिल्लक तपासण्याची कोणतीही मर्यादा नाही आणि सिस्टीम कार्यक्षमता आणि भार कमी करण्यासाठी ५०ची मर्यादा सुरू करण्यात आली आहे.
..
‘यूपीआय’च्या व्यवहारांत ३३ टक्क्यांनी वाढ
मे महिन्यात यूपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या ३३ टक्क्यांनी वाढून १,८६८ कोटी झाली, तर त्यातील रक्कम २३ टक्क्यांनी वाढून २५.१४ लाख कोटी रुपये झाली. ग्राहकांना योग्य लाभार्थीला पैसे पाठवत असल्याचा विश्वास निर्माण करण्यासाठी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी ‘एनपीसीआय’ने ‘यूपीआय’ ॲपना व्यवहारांसाठी फक्त अंतिम लाभार्थीचे नाव दाखविण्याचे आदेश दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.