

सिद्धगडावर बेपत्ता
तरुणाचा शोध
मुरबाड, ता. १६ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील सिद्धगडावर आलेला तरुण रविवारी दरीमध्ये बेपत्ता झाला होता. या तरुणाला शोधून काढण्यात गिर्यारोहकांना यश आले आहे; मात्र हा तरुण जिवंत आहे की नाही, हे त्याला दरीतून बाहेर काढल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
मुंबई येथील १८ पर्यटक मुरबाडपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सिद्धगड येथे रविवारी फिरण्यासाठी आले होते. त्यांच्यापैकी नवी मुंबई येथे राहणारा साईराज चौहान (वय २२) हा तरुण गडावरून खाली पडला होता. मुरबाड पोलिस, बचाव पथक आणि स्थानिकांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र तो रविवारी सापडला नव्हता. सोमवारी त्याचा ठावठिकाणा लागला; मात्र पाऊस पडत असल्यामुळे त्याला दरीबाहेर काढणे कठीण बनले. त्यामुळे सोमवारी बचाव कार्य थांबवण्यात आले. मंगळवारी पुन्हा बचाव मोहीम राबवून त्याला बाहेर काढण्यात येईल, असे तहसीलदार अभिजित देशमुख यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.