ऐरोलीत तरुणीची आत्महत्या

ऐरोलीत तरुणीची आत्महत्या
Updated on

ऐरोलीत तरुणीची आत्महत्या
नवी मुंबई (वार्ताहर) : ऐरोली सेक्टर १ मधील ओमकार गिरी सोसायटीत पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या
एका २२ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. नंदीनी हरिओम तिवारी असे तिचे नाव आहे. तिच्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रबाळे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. मूळची कानपूरची असलेली नंदिनी आयटी कंपनीत काम करीत होती. तीन अन्य तीन तरुणींसह ती राहत होती. रविवारी सुट्टी असल्याने इतर तिघी शनिवारी आपापल्या घरी निघून गेल्या होत्या. तेव्‍हा एकटीच असलेल्या नंदिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com