‘फेम’च्या अध्यक्षपदी रवी पवार

‘फेम’च्या अध्यक्षपदी रवी पवार
Published on

‘फेम’च्या अध्यक्षपदी रवि पवार
नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड

पुणे, ता. १६ : राज्यातील जाहिरात एजन्सीजच्या शिखर संघटनांपैकी एक असलेल्या ‘फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग एंटरप्रेनियर्स’च्या (फेम) नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली असून, रवि पवार यांची अध्यक्षपदी तर प्रकाशभाई शहा यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

‘फेम’चे संस्थापक अध्यक्ष अमरदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली. या वेळी माजी अध्यक्ष मोतीराम पिंगळे, मावळते अध्यक्ष महेश कराडकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल मुथा यांच्यासह पुणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगली, सातारा आदी भागांतील जाहिरात क्षेत्रातील प्रतिनिधी आणि जिल्हा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत २०२५ ते २७ या कालावधीसाठी रामदेव व्यास यांची सचिवपदी, अजिंक्य उजळंबकर यांची सहसचिव आणि कौस्तुभ नाबर यांची खजिनदार म्हणून, तर २०२७ ते २९ या कालावधीसाठी संदीप झवेरी यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून संजय साताळकर, सुनील बासरानी, दीपक जगताप, संतोष उदगिरी, राहुल देशपांडे, नरेंद्र चौधरी, अरुण मलिक, राजेंद्र म्याना, सुनील बुधवानी, राजेश वाळवेकर, परेश पेडणेकर यांची निवड करण्यात आली.

बैठकीच्या सुरुवातीला कराडकर यांनी त्यांचा कार्य अहवाल मांडला. कौस्तुभ नाबर यांनी सादर केलेल्या मागील सभेचे इतिवृत्त व आर्थिक अहवालाला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. पवार यांनी जाहिरात एजन्सीच्या उन्नतीसाठी येणाऱ्या काळात विविध मार्गदर्शन सत्रे तसेच प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येणार असल्याचे सांगितले. जाहिरात एजन्सींसमोरील विविध समस्या व आव्हानांची या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. झवेरी यांनी सूत्रसंचालन केले. व्यास यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com