पैसा, मालमत्तेबरोबर निसर्गाला जपा
मुरबाड, ता. १७ (बातमीदार)ः निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुरबाडच्या मासले बेलपाडा येथे हिरव्या देवाची यात्रा झाली. या वेळी पैसा, मालमत्तेबरोबर निसर्ग जपण्याचा सल्ला श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे यांनी दिला.
मुरबाड, शहापूर, कल्याण अशा परिसरातल्या जुन्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी मासले बेलपाडा येथे एक ऐतिहासिक वास्तुसंग्रहालय उभे राहत आहे. या वस्तुसंग्रहालयात स्वयंपाकासाठी जुन्या काळात वापरली जाणारी भांडी आणि लाकडी वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. तसेच जुन्या काळातील भाता, बैलगाडीची चाके ठेवण्यात आल्याचे वस्तुसंग्रहालयाचे निर्माते अविनाश हरड यांनी सांगितले. या संग्रहालयात जुन्या काळातलं जाते, रथाची चाके, वीरगळ अशा जुन्या मूर्ती ठेवण्यात येणार आहेत. अश्वमेध प्रतिष्ठानच्या माध्यमातून वस्तुसंग्रहालय उभे राहत आहे. तसेच मासले बेलपाडा येथेच मुंबई परिसरातील वन्यजीव पुनर्वसन केंद्र उभे राहिले आहे. या पुनर्वसन केंद्रात ठाणे व मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथून जखमी, अनाथ प्राणी वन खात्याच्या परवानगीने येतात. त्यांच्यावर उपचार केले जातात. तसेच मुंबई विमानतळावर तस्करीद्वारे आणलेले प्राणीदेखील इथे उपचारासाठी आणले जातात.
----------------------------------------------
विविध रानभाज्यांची ओळख
अश्वमेध प्रतिष्ठान, श्रमिक मुक्ती संघटना आणि इंटॅक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या उपक्रमातून रानभाज्यांची शहरी व्यक्तींना ओळख व्हावी, त्या कशाप्रकारे तयार करतात, हे कळावे या हेतूने दरवर्षी रानभाज्या महोत्सव भरवला जातो. या वेळी रानभाज्या विकत घेणाऱ्या उपस्थितांना त्याची पाककृती समजावून देण्यात आली. या वेळी बांबूपासून तयार केलेल्या वस्तू, संकलित केलेले मध, तेल, मोहाची फुले, औषधी वनस्पती, विविध प्रकारच्या बियाही विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.
--------------------------------------------
मल्लखांबाची प्रात्यक्षिके
मल्लखांब क्षेत्रात पद्मश्री मिळालेले उदय देशपांडे यांच्या मदतीने मासले बेलपाडा येथे मल्लखांबाची उभारणी केली जाते आहे. त्याचे प्रात्यक्षिक या वेळी सादर करण्यात आले. कोमल पाटील, अंकुश कामडी यांनी केलेल्या सादरीकरणाने उपस्थित थक्क झाले. याच सादरीकरणाने या यात्रेची सुरुवात झाली. रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाइड आणि कल्याण रिव्हारसाइड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने अश्वमेध प्रतिष्ठानाच्या विद्यमाने येथे दोर मल्लखांबाची स्थापना करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.