वाहनचालकांची तारेवरची कसरत

वाहनचालकांची तारेवरची कसरत

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : पावसाळा आला की रस्त्यांवर पडणारे खड्डे ही नित्याची बाब झाली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच ठाणेकरांचा प्रवास खड्डेमुक्त असावा, यासाठी ठाणे पालिका प्रशासनाने विविध प्राधिकरणांना बैठकांमधून निर्देश दिले होते. असे असताना माजिवड्यासह नितीन उड्डाणपूल आणि मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे शहरातून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
ठाणे पालिक क्षेत्रातून मुंबई-नाशिक आणि घोडबंदरमार्गे वसई, गुजरातच्या दिशेने जाणारे महामार्ग जातात. घोडबंदर मार्गावरील उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभाग, तर पुलाखालील रस्ता मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अखत्यारित येतो. दरवर्षीप्रमाणे या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. अशातच पावसाळ्यात खड्डे पडू नयेत म्हणून संबंधित प्राधिकरणांनी सुरू केलेली रस्त्यांच्या डागडुजीचे कामे मेपासून सुरू झालेल्या पावसामुळे रखडलेली आहेत. यामध्ये गायमुख येथील ठाण्याहून फाउंटनच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेची दुरुस्ती केली होती. तर फाउंटन येथून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेचे काम रखडले आहे. माजिवडा पुलावरील मुंबई मार्गिकेचे काम अर्धवट झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पातलीपाडा, वाघबी‌ळ, माजिवडा या पुलांवर मोठे खड्डे पडले असून, लहान वाहनांच्या अपघाताची भीती आहे.
-----------------------------------------------------
अवजड वाहनांची वाहतूक
- ठाणे महापालिका क्षेत्रातून जाणारा मुंबई-नाशिक महामार्ग आणि घोडबंदर मार्ग मुंबई, पालघर, गुजरात, नाशिक आणि उरण येथील वाहतुकीसाठी महत्त्वाचे मानले जातात. या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते.
- शहरात सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत अवजड वाहतुकीमुळे कोंडी होऊन त्याचा फटका नागरिकांना बसू नये, यासाठी अवजड वाहतुकीसाठी वेळा ठरवून दिल्या आहेत. पण वेळेव्यतिरिक्तही अवजड वाहतूक शहरात सुरू असल्याने कोंडीत भर पडत आहे.


वाहनचालकांची तारेवरची कसरत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com