पायलट सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार

पायलट सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार

Published on

वैमानिक सुमित सभरवाल अनंतात विलीन
वडिलांनी केले मुलाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ ः अहमदाबाद विमान दुर्घटनेतील वैमानिक सुमित सभरवाल (वय ५६) यांच्या पार्थिवावर आज चकाला येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव पवईतील निवासस्थानी आणल्यावर त्यांचे ८८ वर्षीय वडील पुष्कराज सभरवाल यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी मुलाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
सुमित यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी पवईतील निवासस्थानी आणण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सकाळपासून नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी, आमदार दिलीप लांडे, एअर इंडियातील अधिकारी, सहकाऱ्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. आपल्या मुलाचे अंत्यदर्शन घेताना सुमित यांच्या वडिलांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. तीन वर्षांपूर्वीच सभरवाल यांच्या आईचे निधन झाले होते. सुमित यांचे लग्न झाले नव्हते. त्यामुळे वडील हेच त्यांच्यासाठी सर्वस्व होते. अंत्यदर्शनानंतर सकाळी सव्वादहाच्या सुमारास त्यांचे पार्थिव चकाला स्मशानभूमीत नेण्यात आले. अंत्ययात्रेतही हजारो लोक सहभागी झाले होते. मुलाच्या पार्थिवावर वडिलांना अंत्यसंस्कार करताना पाहून उपस्थित लोकही हळहळत होते.
-----------------
श्रद्धा ढवळवर अंत्यसंस्कार
मुलुंड (बातमीदार) ः अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या क्रू मेंबर श्रद्धा ढवळ यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव मुलुंड येथील निवासस्थानी आणण्यात आले. या वेळी हजारो नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. खासदार संजय दिना पाटील या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com