पट्टा रायगड

पट्टा रायगड
Published on

पोयनाडमधील वारकरी देहू आळंदीला रवाना

पोयनाड (बातमीदार) : आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी विठूरायाच्या भेटीसाठी पंढरपूरची पायी वारी करतात. पोयनाड परिसरातील वारकरी देहू येथे रवाना झाले असून काही वारकरी लवकरच आळंदीमध्ये दाखल होणार आहेत. जूनमध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्‍यावर पेरणीची कामे आटोपून वारकरी वारीला निघाले आहेत. पोयनाड, पेझारी, देहेन, भाकरवड, श्रीगाव, तळाशेत, चरी, शहापूर, धेरंड, घसवड या गावांमधील वारकरी हे आपापल्या गावांमधून वाहनाने देहू/आळंदी येथे जाणार आहेत. व तेथून विविध दिंड्यांमधून हरिनामाचा जयघोष करत पंढरपूरला जाणार आहेत. पोयनाड परिसरातील वारकरी पायी वारी करतात. १९ जूनपासून ५ जुलैपर्यंत पायी वारी असून, ६ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. ७ जुलैला वारकऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू होईल.
...........

भूमी अभिलेखकडून गावठाणची सनद वाटप
माणगाव (बातमीदार) ः भूमी अभिलेख कार्यालयाकडून ड्रोनद्वारे गावठाणाचा सर्व्हे करण्यात आला आहे. शाळा प्रवेश महोत्सवाचे उचित साधून मौजे कविलवहाळ बुद येथे जिल्हा अधीक्षक अधिकारी सुनील इंदलकर यांच्या उपस्थितीत नागरिकांना त्याच्या जागेच्या हक्काचा पुरावा सनदीचे वाटप केले. अनेक वर्ष खुल्या गावठाणात राहणाऱ्या नागरिकांना सनदीद्वारे त्याची जागेवर त्‍यांचे नावे लागल्याने मालकी हक्क प्राप्त झाला. कार्यक्रमास गणेश सोनार, कविलावहळ सरपंच प्राची प्रमोद खेतम, उपसरपंच विश्वास बागवे, ग्रामविकास अधिकारी रोशनी वडेकर आदी उपस्थित होते. इंदलकर यांनी महास्वामित्व योजनेअंतर्गत गावठाणमधील घराची सनद वाटप केली.

------

पालकवर्गाकडून शाळेची स्‍वच्छता
श्रीवर्धन, ता. १८ (वार्ताहर) ः तालुक्यातील रानवली येथील रायगड जिल्हा परिषद मराठी शाळेत नवविद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रमास उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे उपस्थित होते. शाळापूर्व तयारीचा एक भाग म्हणून गावात दवंडी देत उपकार्यकारी अधिकारी यांनी दिलेले आवाहनपत्र वाटप करण्यात आले. ‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रमांतर्गत पालकांनी शाळेची स्वच्छता केली. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत दाखलपात्र पाच विद्यार्थ्यांची लेझीम पथकासह मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे ‘पहिले पाऊल’ या उपक्रमांतर्गत घेण्यात आले. या वेळी पाठ्यपुस्तक, गणवेश व बूट-मोजे वाटप करण्यात आले. रानवली येथील विजय मोकल यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, सरपंच सुरेश मांडवकर, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत गिरी व समीर फोपलणकर वडवली केंद्राचे केंद्रप्रमुख श्याम पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा कृणाली अडखळे, उपाध्यक्षा प्रियांका पोतदार, अंगणवाडी कार्यकर्ती रिया गिरी, माजी सरपंच रूपाली जाधव आदी उपस्थित होते.

श्रीवर्धन ः नवविद्यार्थ्यांची लेझीम पथकासह मिरवणूक काढण्यात आली.

-----------------------
रावे शाळेला निर्मला कुचिक यांची भेट
पेण (वार्ताहर) : तालुक्यातील रावे येथील शाळेला जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी शाळेच्या प्रवेशद्वाराला स्वागत फलक तसेच विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देत शिक्षकांकडून स्वागत करण्यात आले. पाठ्यपुस्तकांचे वाटप करून चिमुकल्या विद्यार्थ्यांचे मन रमावे म्हणून विविध खेळणी अशा उत्साहपूर्ण वातावरणात चिमुकल्यांची शाळेत किलबिल पाहावयास मिळाली. निर्मला कुचिक यांच्या भेटीमुळे शिक्षक, पालक तसेच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढला. यावेळी वरिष्ठ विस्तार अधिकारी अरुणा मोरे, प्रमोद पाटील, धनंजय पाटील, गुरुनाथ पाटील, सचिन पाटील, नवनाथ पाटील, अनिता पाटील, मुख्याध्यापिका अनसूया म्हात्रे, आदी उपस्थित होते.

--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com