खडेगोळवलीत नाल्यावरील पुलाचा भाग खचला

खडेगोळवलीत नाल्यावरील पुलाचा भाग खचला

Published on

खडेगोळवलीत रस्त्याचा भाग खचला
कल्याण, ता. २१ (बातमीदार) : खडेगोळवली येथील कल्याण व उल्हासनगरला जोडणाऱ्या नव्याने बनविलेल्या मार्गिकेवरील रस्त्याचा भाग खचला आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. गॅस कंपनी परिसरात असलेल्या नाल्यावरील हा रस्ता आहे. सततच्या पावसानंतर एका बाजूने हा रस्ता खचल्याचे समोर आले आहे. तर स्थानिकांकडून रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
कल्याण पूर्वेतून श्री राम चौकमार्गे उल्हासनगरात प्रवेश केला जातो; मात्र नुकतेच काही वर्षांपूर्वी खडेगोळवलीतून नवी १०० फुटी प्रशस्त मार्गिका बनविण्यात आली आहे. या मार्गिकेमुळे पूना लिंक रोडला न जाता उल्हासनगरात जात येते. त्याचबरोबर या भागातील लोकवस्तीदेखील वेगाने वाढू लागली आहे. नव्याने बनवलेले रस्ते, पूल जर असे खचत असतील तर होणाऱ्या गैरसोयीला जबाबदार कोण, असाही सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. खचलेल्या रस्त्यापासून महानगरपालिकेचे ‘९-आय’ प्रभाग क्षेत्र कार्यालयदेखील हाकेच्या अंतरावर आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा रस्ता तात्पुरता बंद केला असून बॅरिकेड्स लावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com