योग
एकाग्रता जपण्यासाठी योगाभ्यास महत्त्वाचा
जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे मार्गदर्शन; आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त क्रीडा संकुलात कार्यक्रम
अलिबाग, ता. २१ (वार्ताहर) ः सदृढ आरोग्य, आनंदी जीवनशैली आणि जीवनात एकाग्रता जपण्यासाठी योग करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शनिवारी (ता. २१) केले. जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नेहुली येथील क्रीडा संकुलात बॅडमिंटन कोटमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारुद्र नाले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, राहुल कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, मेरा युवा भारतचे अमित फुंडे, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी, क्रीडा अधिकारी सुचिता ठमाळे, आकाश डोंगरे, श्री अंबिका योग कुटीरचे संस्थापक वीरेंद्र पवार या संस्थेचे प्रशिक्षक तसेच स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्थेचे स्वयंसेवक, सरकारी अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
धकाधकीच्या जीवनात शारीरिक व्यायाम, मानसिक स्वास्थ उत्तम असणे आवश्यक आहे. प्राणायाम, ध्यान, योगासने केल्याने मानसिक एकाग्रता वाढते. आज प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या ताणतणावाला सामोरे जात आहे. तणावमुक्त राहण्यासाठी सर्वांनी आपल्या वनशैलीत नियमितपणे योग, व्यायामाचा समावेश करावा, असा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. योग शिक्षिका माधवी पवार यांनी प्रार्थनेने योग प्रात्यक्षिकांची सुरुवात झाली. या वेळी योगपूर्व व्यायाम प्रात्यक्षिकांसह प्राणायाम, नाडी शोधन क्रिया, भ्रामरी हे योग प्रकार करण्यात आले. त्यानंतर ध्यानसाधना करण्यात आली.
...............
नेणवली शाळेत ‘योग संगम’
पाली, ता. २१ (वार्ताहर) ः रायगड जिल्हा परिषदेच्या नेणवली शाळेत योग संगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची योगासने सादर केली. सुरुवातीला मुख्याध्यापक राजेंद्र अंबिके यांनी, योग संगम कार्यक्रमाबाबत माहिती देत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, प्राणायाम, पद्मासन, ताडासन यांसारख्या अनेक योगासनांचे प्रात्यक्षिक केले. योगाचे महत्त्व, त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले फायदे याबद्दल मार्गदर्शन केले. योगामुळे एकाग्रता वाढते, ताण कमी होतो आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते, असे या वेळी सांगण्यात आले.
पाली ः नेणवली शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी योगाभ्यास केला
......
महाविद्यालयात योग, प्राणायामचे प्रात्यक्षिक
माणगाव, ता. २१ (बातमीदार) ः माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे द. ग. तटकरे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात प्राध्यापिका गायत्री वाढवल व शिक्षकेतर कर्मचारी कुमार अक्षय नवघरे यांनी योगा व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपले शरीर तंदुरुस्त राहावे, यासाठी विद्यार्थ्यांनी योगाभ्यास केला. प्राचार्य डॉ. बी. एम. खामकर यांनी, योगाचे आपल्या जीवनात असणारे महत्त्व, मानसिक व शारीरिक स्वास्थासाठी योगा व प्राणायाम करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पंकज गायकवाड व प्राध्यापिका नेहा गावडे, प्रा. आदिल बडे आदींनी केले.
......
शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीसाठी योग आवश्यक
मंत्री आदिती तटकरे यांचे मार्गदर्शन; माणगाव तहसील कार्यालयात कार्यक्रम
माणगाव (बातमीदार) ः तहसील कार्यालयाकडून आयोजित योगदिन कार्यक्रमात राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी सहभाग घेत शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीचे महत्त्व विशद केले. योग शिक्षिका मनीषा राजपूत यांनी योगदिनाची माहिती सांगून, धकधकीच्या जीवनात आरोग्य निरोगी व सुदृढ राहावे, याकरिता प्राणायाम, वज्रासन, ताडासन, भुजंगासन अशी विविध योगाचे प्रकारांची माहिती दिली. या वेळी माणगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, उपविभागीय पोलिस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, तहसीलदार दशरथ काळे, मुख्याधिकारी संतोष माळी, गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट, केंद्रप्रमुख शंकर शिंदे, शिक्षिका विनया जाधव, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे आदी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणगाव येथील शिक्षिका विनया जाधव यांनी केले.
...........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.