मुलभूत सुविधांसाठी झगडा

मुलभूत सुविधांसाठी झगडा

Published on

शहापूर, ता. २१ (वार्ताहर) : ठाणे जिल्ह्यातील शहापूर या आदिवासी तालुक्यातील ३२८ गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याने विदारक स्थिती शहापूर पंचायत समितीने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून समोर आली आहे. त्यामुळे देश स्वतंत्र होऊन जवळपास ७८ वर्षे होत आली तरीदेखील ग्रामस्थांना मूलभूत सुविधांसाठी झगडा करावा लागत आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरापासून ७३ किलोमीटर अंतरावर शहापूर तालुका आहे. तालुक्यात ११० ग्रामपंचायती तर २२७ महसुली गावे आणि ४१४ गावपाडे आहेत. यापैकी ३२८ गावांमध्ये स्मशानभूमीच अस्तित्वात नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे स्मशानभूमी उभारण्याचे नियोजन कागदावरच झाल्याचा प्रत्यय येत आहे. महत्त्वाचे म्हणजे तालुक्यात महसूल गावांची संख्या २२७ असून, वाड्या-वस्त्यांची संख्या ५१४ इतकी आहे. त्यापैकी ४०७ ठिकाणी स्मशानभूमी आहेत; परंतु तेथे पाणी, वीज, रस्ते या सुविधांचा अभाव आहे. पाण्याची सोय केवळ ५९ ठिकाणी आहे, तर ६५४ ठिकाणी पाण्याची सोय नसल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. तसेच ८५ ठिकाणी वीजपुरवठा आहे. मात्र तब्बल ६८० ठिकाणी अद्याप वीजपुरठा नसल्याने तात्पुरत्या साधनांचा आसरा घेऊन रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. तसेच ३१ स्मशानभूमींना संरक्षक भिंती आहेत, परंतु ६८१ ठिकाणी नसल्याचे समोर आले आहे. अस्तित्वात असलेल्या २२९ गावपाड्यांवरच्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे.
---------------------------
लोकप्रतिनिधींचे अपयश
- शहापूर हा तालुका आदिवासी क्षेत्रात असल्याने दरवर्षी मोठ्या संख्येने शासनाच्या आदिवासी उपयोजनेचा निधी मंजूर केला जातो; तरीदेखील स्मशानभूमीसारख्या मूलभूत गरजांची हेळसांड सुरू आहे. राजकीय पक्षांनी जिल्ह्याच्या शहरी भागांचा नागरी विकास झपाट्याने केला असला तरी ग्रामीण भागाकडे सोयीस्कर डोळेझाक झाल्याचे चित्र आहे.
- तालुक्यात दरोडा आणि बरोरा यांनी गेल्या ३० वर्षांपासून आमदार पद आलटून-पालटून भूषवत सत्ता उपभोगली, मात्र आदिवासी गावे, पाड्यांमध्ये मूलभूत सुविधा पोहोचवण्यात दोन्ही लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याची परिस्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com