अफवांवर विश्वास ठेऊ नका
अंबरनाथ, ता. २२ (वार्ताहर) : पश्चिमेतील मोहन सबार्बिया फेज-२ सोसायटीतील ‘पी’ विंगमध्ये बसवलेले टीओडी मीटर काढायला लावून एजन्सीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मोहन सबार्बिया सोसायटीतील वीजग्राहकांचे टीओडी मीटरबाबत असलेले गैरसमज दूर करण्यात आले आहेत. हे मीटर बसवण्याची कार्यवाही सुरळीत सुरू असल्याची माहिती उल्हासनगर विभाग दोनचे कार्यकारी अभियंता प्रवीण चकोले यांनी दिली. टीओडी मीटरपासून ग्राहकांना मिळणारे लाभ लक्षात घेता ग्राहकांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता मीटर बसवण्याच्या कामात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
महावितरणतर्फे राज्यभरात अत्याधुनिक असे टीओडी (टाईम ऑफ डे) मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. महावितरणच्या नव्या वीजदर प्रस्तावात ग्राहकाने वीज कधी वापरली त्या वेळेनुसार दरात सवलत प्रस्तावित आहे. टीओडी मीटर असल्याशिवाय ही सवलत मिळू शकणार नाही. ग्राहकांकडे बसवण्यात येत असलेले मीटर प्रीपेड नव्हे तर पोस्टपेड आहेत. त्यामुळे पहिल्यासारखेच विजेचा वापर केल्यानंतर बिल येणार आहे. तसेच आधुनिक मीटर असल्यामुळे अचूक रीडिंग आणि महावितरण व ग्राहकांना सातत्याने मोबाईलवर विजेचा वापर समजण्यासारख्या नव्या सुविधा यात आहेत. मुख्य म्हणजे महावितरणकडून ‘सुधारित वितरण क्षेत्र योजना’ या केंद्र सरकार पुरस्कृत योजनेतून ग्राहकांकडे हा मीटर मोफत बसविण्यात येत आहे. वीज कायदा २००३मधील तरतुदीनुसार ग्राहकांच्या अचूक वीजबिलासाठी ग्राहकांकडे अत्याधुनिक मीटर बसवणे ही महावितरणची जबाबदारीच नव्हे, तर अधिकारही असल्याचे कार्यकारी अभियंता चकोले यांनी स्पष्ट केले आहे.
कामात व्यत्यय आणणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
मोहन सबार्बिया सोसायटीत १० जूनला टीओडी मीटर बसवताना कृष्णा रसाळ यांनी विरोध करत एजन्सीच्या कर्मचाऱ्यावर हात उचलला होता. एजन्सीने यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीवरून अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रसाळ यांचे मीटरवगळता सोसायटीतील इतर ग्राहकांकडे एजन्सीकडून टीओडी मीटर बसवले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.