ठाण्यात २० वर्षात नैसर्गिक आपत्तीत गमावले ३९६ जणांनी प्राण

ठाण्यात २० वर्षात नैसर्गिक आपत्तीत गमावले ३९६ जणांनी प्राण

Published on

ठाण्यात २० वर्षांत नैसर्गिक आपत्तींमध्ये गमावले ३९६ जणांनी प्राण
आठ बेपत्तांचीही नोंद; तब्बल एक कोटींची वित्तहानी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : मागील २० वर्षांत पावसाळ्यात ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये ठाणे शहर पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात तब्बल ३९६ जणांनी आपले प्राण गमावले आहेत, तर ६७६ मुक्या जीवांचाही मृत्यू झाला आहे. याचदरम्यान आठ जण बेपत्ता झाल्याचे ठाणे शहर पोलिसांनी यंदाच्या नैसर्गिक आपत्ती योजना २०२५मध्ये नमूद केले आहे. तसेच या २० वर्षांच्या कालावधीमधील २०१२ यावर्षी नैसर्गिक आपत्तीत एकाही व्यक्तीने प्राण गमावलेला नाही. याच २० वर्षांत सुमारे एक कोटी रुपयांची वित्तहानी झाल्याचेही नमूद केले आहे.
यंदाच्या पावसाळ्यात कोणत्याही प्रकारे जीवितहानी व मालमत्तेची हानी होऊ नये, यासाठी पोलिसांनी ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या ह‌द्दीतील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन व उपाययोजना आराखडा २०२५ तयार केला आहे. त्यामध्ये उपाययोजना आदींची माहिती नमूद केलेली आहे. याशिवाय २००५ ते २०२४ या २० वर्षांतील नैसर्गिक आपत्तींचा लेखाजोखा मांडला आहे. त्यानुसार २० वर्षांत ३९६ जणांनी नैसर्गिक आपत्तींमध्ये प्राण गमावल्याचे दिसत आहे. तसेच २९५ जखमी झाले असून आठ जण बेपत्ता झाल्याचे म्हटले आहे. याशिवाय ६७६ जनावरांवर काळाने झडप घातल्याचे नमूद केले आहे. यामध्ये सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
याशिवाय त्या पुस्तकात स्थलांतराबरोबर पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यास, नागरी वस्तीत पाणी शिरल्यास, दरड किंवा जुन्या इमारती कोसळल्यास, रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यास काय केले पाहिजे, याबाबत उपाययोजनावजा सूचनाही केल्या आहेत.

‘हा’ आहे उद्देश
नैसर्गिक आपत्तीत मनुष्यहानी व वित्तहानी मोठ्या प्रमाणात होते. अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जनतेत घबराटीचे वातावरण पसरते. चोरटे, समाजकंटक त्याचा गैरफायदा उठवितात. अशा वेळी निराधारांना आधार व दिलासा देणे हे कार्य प्रामुख्याने शासकीय यंत्रणेचे असते. याअंतर्गत सुरक्षा राखणे व आपद्‍ग्रस्तांना वेळीच योग्य ते सहाय्य पुरवून आपत्तीचे शक्य त्या तऱ्हेने निराकरण करणे, सर्वसामान्य जनजीवन सुरळीत करणे हा या व्यवस्थापन आराखड्याचा हेतू आहे, असे स्पष्ट केले आहे.

२० वर्षांतील नैसर्गिक आपत्तीचा तक्ता
सन मयत / जखमी/ वित्तहानी/घडलेल्या घटना
२००५ १७५ / ०० /००,००,००० / ००
२००६ ००२/ ०० /००,००,००० / ००
२००७ ०१२/ ०० /००,००,००० / ००
२००८ ००७/ ०० /००,००,००० / ००
२००९ ००५/ १७ / ९७,०००/ ००
२०१० ०२०/ ३३ /२३,१४,०००/ ००
२०११ ००५/ १९ /४३,६०,८५०/ ००
२०१२ ०००/ ११/ ०२,३७,०००/ ००
२०१३ ००८/ ३२/ ०८,७२,०००/ १०
२०१४ ००३/ ४५/ ०८,५२,०००/ ०५
२०१५ ०२२/ ३१/ ००,५०,०००/ १२
२०१६ ०१६/ २७/ ०१,८०,०००/ ०८
२०१७ ००६/ १२/ ००,००,०००/ ०५
२०१८ ००४/ ०३/ ००,३०,०००/ ०४
२०१९ ०१८/ ०८/ ००,००,०००/ १३
२०२० ०३९/ २४/ ०५,००,०००/ ०४
२०२१ ०२२/ ०६/ ०३,००,०००/ ०९
२०२२ ०१६/ ०९/ ००,३८,०००/ १५
२०२३ ०१५/ १८/ ००,००,०००/ ०६
२०२४ ००१/ ००/ ००,००,०००/ ०१
...................................................
एकूण ३९६/२९५/९८,३०,८५०/ ९२

..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com