लाईव्ह न्यूज

साथीच्या आजारांचे सावट

साथीच्या आजारांचे सावट
Published on: 

वासिंद, ता. २३ (बातमीदार) : नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वासिंदमधील घराघरांत पाणीपुरवठा केला जात आहे, पण लाखो रुपयांची पाणीपट्टी मिळवणाऱ्या ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाने सध्या गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने साथीच्या आजारांचे सावट आहे.
वासिंद गावाची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता आघाडी सरकारच्या काळात साडेपाच कोटींची वाढीव नळ पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र प्राधिकरणातून मंजूर करण्यात आली होती. या योजनेतील निकृष्ट कामांची मोठी किंमत सध्या वासिंदकरांना चुकवावी लागत आहे, कारण सहा प्रभागांमधील फक्त एकाच पाण्याच्या टाकीवर तीस लाखांची फिल्टर योजना बसविण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवस पश्चिम भागात शुद्ध पाण्याचा पुरवठा होत होता, परंतु या यंत्रणेच्या देखभाल, दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने नागरिकांना पुन्हा गढूळ पाणी प्यावे लागत आहे. अशातच सध्या वासिंद गावाची लोकसंख्या तीस ते पस्तीस हजारांच्या आसपास गेली आहे, पण त्या अनुषंगाने नागरी सुविधा पुरविण्यात वासिंद ग्रामपंचायत अपयशी ठरल्याचे चित्र आहे.
-------------------------------------------
तळाशी मातीचा थर
वासिंद गावाजवळ बाराही महिने वाहणारी भातसा नदी आहे. तरीदेखील वर्षभर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशातच पावसाळा सुरू झाल्याने चहा, कॉफीच्या रंगाचे गढूळ पाणी घरोघरी येत आहे. या पाण्यावर तुरटी फिरवल्यास मातीचा लगदा खाली बसत असल्याने अशुद्ध पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिकांना साथीच्या आजारांना सामोरे जावे लागते आहे.
------------------------------------------
पैसे घेऊन पाणीवाटप
- वासिंदमधील बहुतेक सोसायटींमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून पैसे घेऊन पाणी सोडले जात असल्याच्या तक्रारी आहेत. पाण्याच्या टाकीत पाणी नाही. पाण्याची मोटार बिघडली, पाणीपट्टी भरली नाही, अशी वेगवेगळी कारणे देत सोसायटीमध्ये पाणी सोडले जात नाही.
- कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटिशीशिवाय कर्मचारी मनमानी करत असतात. एखाद्याने पैसे दिल्यास त्यांना जादा वेळ पाणी सोडले जाते. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com