आणीबाणीतील लोकशाही लढ्यासंदर्भात आज कार्यक्रम

आणीबाणीतील लोकशाही लढ्यासंदर्भात आज कार्यक्रम

Published on

कल्याण, ता. २४ (वार्ताहर) : सरकारच्या निर्देशानुसार १९७५-७७ दरम्यान घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीला बुधवारी (ता. २५) ५० वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थी, नागरिक, विविध संस्थांसह संविधान जनजागृती रॅली सकाळी ७.३० वाजता काढण्यात येणार आहे.
या रॅलीची देशभक्तिपर गीतांच्या सुरावटीत कल्याण (पश्चिम) येथील दुर्गामाता चौक (सीएनजी गॅस), लालचौकी, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे अत्रे रंगमंदिर येथे रॅलीची सांगता होईल. त्यानंतर अत्रे रंगमंदिरात शालेय मुलांच्या देशभक्तिपर, बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या वेळी अत्रे रंगमंदिरातील तळ मजल्यावर डिजिटल स्टॅन्डीच्या माध्यमातून आणीबाणीविषयक माहितीपर छायाचित्रे प्रदर्शित केली जातील. त्याचप्रमाणे डोंबिवलीतील ख्यातनाम साहित्यिक माधव जोशी हे आणीबाणी, तसेच संविधानविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला खासदार, आमदार, माजी लोकप्रतिनिधींची उपस्थिती लाभणार आहे. नागरिकांनीही अत्रे रंगमंदिरातील कार्यक्रमाला उपस्थित राहून, सरकारच्या या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com