रायगड जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत जमावबंदी
अलिबाग, ता. २५ (वार्ताहर)ः जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या शिफारशीनुसार आणि अपर जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार २४ जून ते ८ जुलै २०२५ पर्यंत रात्री १२पर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यातील खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग या औद्योगिक भागांमध्ये कामगार संघटनांकडून आंदोलन व संप पुकारले जात असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय २७ जून ते ६ जुलैपर्यंत मुस्लिमबांधवांकडून मोहरम साजरा करण्यात येणार आहे. मोहरमनिमित्त पाच ठिकाणी नमाजपठण करण्यात येणार असून ७२ ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. तसेच ६ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे. कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केली आहे.
जमावबंदीदरम्यान शस्त्र, लाठ्या, सुरे, तलवारी आदी वस्तू बाळगणे, प्रक्षोभक प्रतिमा किंवा आकृत्यांचे सार्वजनिक प्रदर्शन करणे, आक्षेपार्ह घोषणा, गाणी किंवा वाद्य वाजविल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अधिसूचनेतून सरकारी अधिकारी, कर्तव्यावरील कर्मचारी, तसेच शवयात्रा व अंत्यविधीसाठी जमणारा जमाव आणि तहसीलदारांच्या परवानगीने आयोजित कार्यक्रम वगळण्यात आले आहेत.
आयोजकांवर जबाबदारी
तहसीलदार किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यावरच कोणताही उत्सव, सभा, मिरवणूक आयोजित करता येणार असून त्याची जबाबदारी आयोजकांची असेल. पोलिस व जिल्हा प्रशासनाने नागरिकांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

