आरटीईच्या प्रवेशाकडे पनवेलकरांची पाठ

आरटीईच्या प्रवेशाकडे पनवेलकरांची पाठ

Published on

पनवेल, ता. २५ (बातमीदार) : मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमांतर्गत पनवेलमधील शाळांमध्ये २५ टक्के जागांवर आतापर्यंत दोन हजार ५०१ पैकी दोन हजार २०३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. अजून ३९८ जागा रिक्त आहेत. यामध्ये बालाजी इंटरनॅशनल स्कूलने नाकारलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. शिक्षण विभागाने चौथ्या फेरीत प्रवेश घेण्यासाठी पालकांना पुन्हा ९ जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. तरीसुद्धा याकडे पालकांनी पाठ फिरवली आहे.
पनवेलमध्ये सरकारी व खासगी मिळून ५५५ शाळा आहेत. यंदा पनवेलमधील ११३ शाळांमधून दोन हजार ५०१ विद्यार्थ्यांना आरटीईमधून मोफत शिक्षण मिळणार आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्यानुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा नियम आहे. पनवेल तालुक्यातील २८ हजार ७८५ पालकांनी आरटीईसाठी अर्ज केले होते. आरटीई पात्र शाळांमध्ये आरटीई प्रवेशासाठी दोन हजार ५०१ जागा आहेत. त्यामधून दोन हजार २०३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत; तर २९८ पालकांनी शाळांच्या दर्जानुसार आरटीईमध्ये नंबर लागूनही शाळा नाकारल्या आहेत. एवढे अर्ज येऊनही उच्च दर्जाच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्याचा पालकांचा हट्ट असल्याने मोफत प्रवेशाच्या जागा रिक्त राहात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
------------------
स्टेट बोर्डसाठी नकार
यंदा प्रवेश प्रकिया वेळेत पूर्ण होऊनही अनेक जागा रिक्त राहिल्या. त्याचे कारण म्हणजे पालकांना अर्ज भरताना योग्य मार्गदर्शन न मिळणे, पसंतीची शाळा न मिळणे, अर्जात पालक सीबीएसई/स्टेट/इंटरनॅशनल असे सर्व प्रकारचे बोर्ड सिलेक्ट करतात आणि जर स्टेट बोर्डला नंबर लागला, तर प्रवेश घेण्यासाठी उत्सुक दिसत नाहीत. यासह अन्य कारणांमुळे पालकांनी मोफत प्रवेशाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
----------------
रिक्त जागा भरण्यासाठी आदेशाची प्रतीक्षा
काही जागांवर पालकांचे अर्ज आले नाहीत; तर मिळालेल्या जागांवर काही पालकांनी प्रवेशच घेतले नाहीत. त्यामुळे या जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे, असे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाकडून अद्याप पुढील निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे रिक्त जागा या तशाच राहणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी सीताराम मोहिते यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com