विसर्जन तलावाला सुविधा पुरवा
जुईनगर, ता. २५ (बातमीदार) : गणेशाच्या आगमनाची चाहूल सर्वच गणेशभक्तांना लागली आहे. त्या आगमनाबरोबर त्याला भावपूर्ण निरोप देण्याचीदेखील योजना आखली जाते. या योजनेचा भाग म्हणून मूर्ती विसर्जनासाठी सानपाडा रहिवाशांकडून सानपाडा रेल्वेस्थानकाजवळ तलावाचे खोदकाम करण्यात आले आहे. लोकसहभागाने बनवलेल्या तलावाला सुविधा पुरवण्याची मागणी सानपाडा रहिवासी करीत आहेत. तलावाची महापालिका प्रशासनाने कागदोपत्री नोंद करून त्याची दखल घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
सानपाडा नोडमध्ये हजाराहून अधिक गणरायांची स्थापना केली जाते. सहा मोठे सार्वजनिक गणेशोत्सव, १००हून अधिक रहिवासी सोसायट्यांचे गणेशोत्सव; तर उर्वरित घरगुती गणपती विराजमान होतात. या सर्वांना विसर्जनासाठी सानपाडा येथे तलाव नव्हता. तुर्भे एमआयडीसीतील खोडक तलाव, जुईनगरमधील चिंचोली तलाव, तुर्भेगाव येथील रामतनुमाता तलाव आदी तलावांकडे गणेशभक्तांना जावे लागत होते. त्यावर पालिकेने मैदान आणि काही मध्यवर्ती ठिकाणी कृत्रिम तलाव निर्मिती करून याबाबत गणेशभक्तांना दिलासा दिला होता.
------------------
भूखंड अद्याप सिडकोकडून हस्तांतरित नाही
सानपाडा ग्रामस्थांनी खोदलेल्या तलावाची नोंद करून गणेशमूर्ती विसर्जनाकरिता रस्ता, घाट व विद्युत व्यवस्था करावी, अशी मागणी माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी केली आहे. सध्या सानपाडा ग्रामस्थांनी खोदलेल्या तलावाचा भूखंड सिडकोकडून पालिकेकडे हस्तांतरित नाही. त्या ठिकाणी ग्रामस्थांकडून कृत्रिम तलावासंदर्भात मागणी आल्यास ती सुविधा अथवा मूर्ती विसर्जन कंटेनर आपण देऊ शकतो, तुर्भे विभाग अधिकारी सागर मोरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.