आणीबाणीच्या काळात दिलेला लढा कौतुकास्पद
‘आणीबाणीत दिलेला लढा कौतुकास्पद’
अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : आम्ही आणीबाणीचा काळ पाहिलेला नाही. तुम्ही आणीबाणीच्या काळात दिलेला लढा कौतुकास्पद असल्याचे मत अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी व्यक्त केले. देशात १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान ठाणे जिल्हा प्रशासनाने बुधवारी (ता. २५) जिल्हाधिकारी कार्यालयात केला. या वेळी प्रभारी उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन सचिन चौधर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील अनिल भदे, पद्मनाभ शेट्टी, दिलीप ननावरे, प्रभा गोरे,मनोहर अत्रे, विलास दळवी, अंजली ओक, भारती वैद्य, शांताराम राजपुरे, जयंत जोशी, मुकुंद धायगुडे, विजयकुमार पवार, अनिल महाडिक यांच्यासह १२९ जणांचा सन्मान या वेळी करण्यात आला. त्यांना अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देण्यात आले. त्या वेळी उपस्थितांनी ‘भारत माता की जय, वंदे मातरम’ अशा घोषणा दिल्या. यात ठाणे, भिवंडी, कल्याण यासह विविध भागांतील लोकांचा समावेश होता. त्यातील काहींनी आणीबाणीच्या आठवणींना, त्यांनी त्या वेळी केलेल्या सत्याग्रहाच्या आठवणींना तसेच कारागृहातील आठवणींना आपल्या मनोगतातून उजाळा दिला.
मानधन महिन्याच्या १५ तारखेच्या आत मिळावे ः अनिल भदे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानधन विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटपासून आम्हाला मानधन सुरू झाले. आता शासनाने मानधन दुप्पट केले आहे. हे मानधन महिन्याच्या १५ तारखेच्या आत मिळावे, अशी इच्छा अनिल भदे यांनी व्यक्त केली. तसेच आजच्या कार्यक्रमाचे श्रेय ठाणे जिल्हा प्रशासनाचे असल्याचेदेखील त्यांनी या वेळी म्हटले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.