थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

Published on

आदर्श सोसायटीत पालिकेचे कापड संग्रह केंद्र
जुईनगर, ता. २५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या कापड संग्रह उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. नेरूळ सेक्टर-२ मधील आदर्श रहिवासी सोसायटीमध्ये संकलन पेटी ठेवण्यात आली आहे. प्रत्येक महिन्याला पालिकेकडून यातील जमा कपडे संकलित करण्यात येणार आहेत. याबाबत पालिकेतर्फे जनजागृती मोहीम रहिवासी सोसायटी स्तरावर राबवणे सुरू आहे. शिवाय स्वतःहून एखादी सोसायटी हा उपक्रम राबवण्यात इच्छुक असल्यास त्यांनादेखील पालिकेतर्फे संकलन पेटी देण्यात येणार आहे. काही रहिवासी सोसायट्यांनी एकत्र एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी मागणी केल्यास त्यांनादेखील संकलन पेटी देण्यात येईल, असे नेरूळ विभाग अधिकारी जयंत जावडेकर यांनी सांगितले. आदर्श रहिवासी सोसायटीने पालिकेच्या एक हात मदतीचा, या उपक्रमाला सहकार्य करत कपडे व कापड संग्रह पेटी आपल्या सोसायटीमध्ये ठेवली आहे. सोसायटीमध्ये ३० इमारती असून, ३०० सदनिका आणि जवळपास एक हजाराहून अधिक रहिवासी राहात आहेत. पालिका या कपड्यांचे संकलन करून गरजू आणि गरिबांना मदत करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
.................
शिवाई फाउंडेशनतर्फे रक्‍तदान शिबिर
नवी मुंबई ः शिवाई फाउंडेशनतर्फे रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ९७ जणांनी रक्‍तदान शिबिरासाठी नोंदणी केली होती. डॉ. सत्वशील राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी ६९ जणांनी रक्‍तदान केले. शिवाई फाउंडेशन आणि डॉ. सत्वशील राणे यांच्यातर्फे संबंधित रक्‍तदात्यांचे आभार मानण्यात आले.
...............
ज्ञानदीप सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेत मोफत स्कूल किटचे वाटप
नवी मुंबई ः ज्ञानदीप सेवा मंडळाची प्राथमिक शाळा करावे येथे आय. के. एस. हेल्थ कंपनी व सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांना मोफत स्कूल किटचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी ही मदत खूप मोलाची ठरेल, असे आयोजकांकडून सांगण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी सेवा सहयोग फाउंडेशन मुंबईच्या समन्वयक ऋतिका शेलार, रेश्मा पट्टम तसेच ज्ञानदीप सेवा मंडळ संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या सुरेखा तांडेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांची मोलाची साथ लाभली.
......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com