भंगारचोरीप्रकरणी मनोरमध्ये गुन्हा
मनोर ः तारापूर औद्योगिक वसाहतीमधून स्क्रॅप रोल वाहतूक करणाऱ्या मातोश्री ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रकचालक आणि भंगारमाफियांवर चोरीप्रकरणी मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दुर्वेस गावाच्या हद्दीतील जैन मंदिराच्या परिसरात ट्रकचालकाने भंगारमाफियाशी संगनमत करून गुरू ब्रदर्स कंपनीच्या क्रेनच्या ५०० किलो वजनाच्या स्क्रॅप रोलची चोरी केली होती. याप्रकरणी ट्रकचालक सचिनकुमार, टेन नाका येथील भंगारमाफिया समीउल्ला शेख ऊर्फ पूर्वा, इम्तियाज समीउल्ला शेख आणि गुरू ब्रदर्स कंपनीच्या क्रेनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

